शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘नागरिकांच्या श्रमदानातून उभी राहिली पोलीस ठाण्याची इमारत’

By admin | Updated: February 2, 2016 01:41 IST

वाडा पोलीस आणि जनता यांच्यात मित्रत्वाचे नाते असून संजय हजारे यांनी ते अधिक दृढ केले आहे. पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये प्रेम, आदर निर्माण झाला

वाडा : वाडा पोलीस आणि जनता यांच्यात मित्रत्वाचे नाते असून संजय हजारे यांनी ते अधिक दृढ केले आहे. पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये प्रेम, आदर निर्माण झाला असून पोलिसांविषयी असलेल्या आस्थेचे प्रतीक म्हणूनच नागरिकांच्या श्रमदानाने ही पोलीस ठाण्याची भव्य वास्तू उभी राहिली असल्याचे प्रतिपादन कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी वाडा येथे केले.वाडा पोलीस ठाण्याच्या वतीने गुरुवार सायंकाळी ५ वा. च्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारातील विस्तारीत नूतन इमारतीचे तसेच परेड मैदानावरील सलामी मंचाचे उद्घाटन बुरडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी संजय हजारे यांच्या कामाचे कौतुक केले. पोलीस पाटील कोंडू लोखंडे (पिक), अनंता पडवळे (कळंभई), पोलीसमित्र अनिल पाटील (कलमखांड), संजय लांडगे (वाडा), महिला दक्षता समिती सदस्या शालिनी गायकवाड, राजश्री तरसे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी पोलीस पाटील मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. पोलीस पाटील, पोलीसमित्र, महिला दक्षता समिती यांना कायदेविषयक मार्गदर्शन अ‍ॅड. विनय भोतपराव यांनी केले.कार्यक्रमास पालघर जिल्हा पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, अप्पर पोलीस आयुक्त भगवान यशोद, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक जगताप, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप जाधव, भिवंडी ग्रामीणचे आ. शांताराम मोरे, शिवसेवा ठाणे जिल्हा (ग्रा.) प्रमुख प्रकाश पाटील, पालघर जि.प. गटनेते निलेश गंधे, उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, भाजपाचे तालुकाप्रमुख संदीप पवार, सभापती अरुण गौंड, उपसभापती नंदकुमार पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख पांडुरंग पठारे, काँग्रेसचे दिलीप पाटील, बहुजन विकास आघाडीचे अनंता भोईर, श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमास पोलीस पाटील, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.