शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वसई खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:06 IST

१५३ वर्षे जुना : विरार व त्या वेळच्या बॉम्बे बॅकबे रेल्वेस्थानकादरम्यानची पहिली रेल्वे १२ एप्रिल १८६७ रोजी धावली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कभाईंदर  : नायगाव आणि भाईंदर दरम्यानच्या वसई खाडीवर रेल्वे सेवेसाठी ब्रिटिशांनी स्वातंत्र्यापूर्वी बांधलेला १५३ वर्षे जुना पूल रेल्वे प्रशासनाने तोडण्यास घेतला आहे. मंगळवारपासून पुलाच्या तोडकामास सुरुवात झाली आहे.

विरार व त्या वेळच्या बॉम्बे बॅकबे रेल्वेस्थानकादरम्यानची पहिली रेल्वे १२ एप्रिल १८६७ रोजी धावली होती. त्यासाठी नायगाव ते भाईंदर स्थानकादरम्यान असलेल्या वसई खाडीवर ब्रिटिशांनी खोल खाडीत हा पूल उभारला होता. पण हा पूल जुना झाल्याने रेल्वे प्रशासनाने १९८९ च्या दरम्यान काँक्रिटचा नवा पूल खाडीवर बांधला. तेव्हापासून जुन्या पुलावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. हा पूल हलक्या वाहनांसाठी सुरू करावा, अशी मागणीही अनेक वर्षांपासून होत होती. रेल्वे बंद झाली तरी पाणजू बेटावरील ग्रामस्थ ये-जा करण्यासाठी या जुन्या पुलाचा वापर काही वर्षे करीत होते. पण रेल्वे प्रशासनाने आता पूल तोडण्याचे कंत्राट देऊन कामही सुरू केले आहे.

विरार ते बॉम्बे बॅकबे या दरम्यानच्या रेल्वे स्थानकाची नावेही नाला, बेसिन, पंजे, बोरवला, पहाडी, अंडारू, सांताक्रुज, बंडोरा, माहिम, दादुर, ग्रांट रोड अशा प्रकारची होती. नंतर या स्थानकांची नावे बदलण्यात आली. १८ व्या शतकातील हा पूल रेल्वे चालवण्यास बंद केल्यानंतरही ताठ मानेने उभा होता. काही भागात त्याची पडझड झाली होती. पण खाऱ्या पाण्यात व खाडीच्या लाटांना अंगावर झेलत १५३ वर्षे या पुलाने काढली. रेल्वेने पूल तोडण्यासाठी लिलाव केला. सध्या नायगाव आणि पाणजू दरम्यानच्या पुलाचा लिलाव झाल्याने कंत्राटदाराने हा पूल तोडण्यास सुरुवात केली आहे. खांबाला हात न लावता गॅस कटरच्या मदतीने तोडण्याचे काम सुरू आहे. भाईंदरकडच्या पुलाचा लिलाव बाकी आहे.

शिसे, तांब्याचा मोठ्या प्रमाणात वापरnजाणकार सांगतात की, या पुलाच्या पाण्यात उभ्या असलेल्या खांबात काम करताना शिसे, तांबे मोठ्या प्रमाणात ओतण्यात आले होते.nआज त्या काळातील या शुद्ध धातूंची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात जाणार आहे. काही पिढ्यांचा साक्षीदार व आधारवड असा हा पूल तुटताना पाहून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.