शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरमधील कराटेपटूंची चमकदार कामगिरी; ६० पदकांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 22:51 IST

सातारा येथे झाली राष्ट्रीय मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धा, खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव

भाईंदर : मीरा-भाईंदर येथील ३४ कराटेपटूंनी सातारा येथे झालेल्या ३१ व्या राष्ट्रीय मार्शल आर्ट चॅम्पियनशीपमध्ये चमकदार कामगिरी करत १५ सुवर्ण पदकांसह मीरा-भाईंदर शहराच्या खात्यात तब्बल ६० पदकांची भर टाकली.कराटेसह स्केटिंगमध्ये शहराचे नाव जागतिक स्तरावर पोहचले असून यातील काही क्रीडापटूंनी तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आले असतानाच सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय मार्शल आर्ट चॅम्पियनशिप या स्पर्धेत ३४ कराटेपटूंनी ६० पदकांची लयलूट केली. यात १५ सुवर्णासह १९ रौप्य व २६ कांस्य पदकांचा समावेश आहे.राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, आसाम, गोवा व गुजरातमधील ६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातील मीरा-भाईंदरमधील कुशल म्हात्रे, पवन पुजारी, धृती शेट्टी, सोहम झरेकरने, जिया खान, मुस्तफा रामपुरावालाने कुमिते प्रकारात प्रत्येकी सुवर्ण तर काता प्रकारात प्रत्येकी रौप्य पदक अद्वैत पिल्लई, लवकुश कश्यप, पार्थ तावडेने कुमिते मध्ये प्रत्येकी कांस्य तर कातामध्ये प्रत्येकी रौप्य, तनुश्री खंडेलवाल, जान्हवी सोनावणे, आकाश राठोड, सलोनी चिंगळेने कुमितेमध्ये प्रत्येकी रौप्य तर काता मध्ये प्रत्येकी कांस्य, सोहम नंदीने कुमितेमध्ये सुवर्ण, सिद्देश गावडे, पार्थ पारेखने कुमितेमध्ये प्रत्येकी रौप्य, सोनित चेत्रीने काता मध्ये सुवर्ण तर कुमितेमध्ये रौप्य, एहसान शेख, जमिला रामपुरावाला, सैज्ञा भोगटे, प्रथम जैनने कुमिते व कातामध्ये प्रत्येकी कांस्य, अध्यान सिंघानियाने कातामध्ये सुवर्ण, विधी खेमानी, सुधीक्षा विश्वनाथ, माधवी तावडेने कुमितेमध्ये प्रत्येकी सुवर्ण तर कातामध्ये प्रत्येकी कांस्य, छवी जैनने कुमिते व कातामध्ये प्रत्येकी सुवर्ण, अली असगर, निधीश शेट्टीने कुमितेमध्ये प्रत्येकी कांस्य, हर्षिल खानने कुबोदो व कुमिते मध्ये प्रत्येकी कांस्य, श्लोक शेट्टी, शाझेब शेखने कातामध्ये प्रत्येकी कांस्य, मनवीत शेट्टीने कुबोदो मध्ये कांस्य तर कुमितेमध्ये सुवर्ण, साई मांजरेकरने कुमितेमध्ये कांस्य तर कातामध्ये रौप्य, स्मर्णी राणेने कुमिते व कातामध्ये प्रत्येकी रौप्य पदक मिळवले. या कराटेपटूंना प्रशिक्षक विजय शिगवण, विनायक रेडकर, अरूण मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :bhayandarभाइंदर