शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीसाठी बंद असलेल्या पुलाचा झाला स्केटिंग ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 05:35 IST

वाहतुकीस बंदी : तरीही आदेश मोडून वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

वसई : वसईतील दुरूस्तीसाठी बंद असलेला जुन्या अंबाडी पुलाच्या दुरूस्तीसाठी मूहूर्त मिळाल्यानंतर रेल्वेकडून पुलावरील भार काढण्यास गेल्या महिन्याच्या १३ आॅक्टोबर पासून सुरवात करण्यात आली आहे. मात्र गेले तीन महिने बंद असलेल्या या पुलावरून वाहतूकीस बंदी असतानाही ती सुरु आहे. त्याबरोबरच आता या बंद पुलावर तरूण मूले स्केटींग करताना दिसत आहेत. माहिती देऊनही वाहतूक विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

१३ आॅक्टोबर पासून जुन्या अंबाडी रोड रेल्वे उड्डाणपूलावरील पालिकेच्या जलवाहिन्या, महावितणाच्या केबल्स, खाजगी मोबाईल कंपन्यांच्या केबल्स काढून टाकण्यास सुरवात झाली होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीचा निधी येई पर्यंत दुरस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याचे रेल्वेने सांगितले होते. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने सर्व धोकादायक पुल बंद केले होते. त्या पुलांची पाहणी करून ते दुरूस्त केले जाणार होते. वसईच्या अंबाडी रोडवरील पुर्व आणि पश्चिमेला जोडणारा ३८ वर्ष जूना पूल बंद करण्यात आला होता. पुलाचे स्ट्रक्टरल आॅडीट न करता धोकादायक कसा काय असा सवाल पालिकेने करून तो खुला करण्याची मागणी केली होती. याबाबत एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यात महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे, महावितरण, खाजगी मोबाईल कंपन्या आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. पुलाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी त्यावरील भार हलका करण्याचा निर्णयÞ त्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार जुन्या पूलावरून गेलेल्या पालिकेच्या जलवाहिन्या, महावितरणाचे आणि खाजगी मोबाईल कंपन्यांचे केबल्स काढण्याचा निर्णयÞ घेण्यात आला. १३ तारखेपासून कामाला सुरवात झाली आहे. या पुलाच्या दुरूस्तीचा खर्च दोन कोटी रु पये असून पश्चिम रेल्वेने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा खर्च मागितला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हा निधी येईपर्यंत रेल्वेकडून दुरूस्तीचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली होती.पुलावर बेकायदेशीर वाहनतळ, गॅरेजवाल्यांच्या गाड्यांचे पार्किंगदुरूस्तीच्या नावाखाली बंद असलेल्या अंबाडी पूलाच्या दोन्ही मार्गावर बेकायदेशीर पणे सरार्स वाहने पार्किंग होऊ लागली आहेत. वाहतूक पोलिसांचे लक्ष नसल्याने कोणीही याठिकाणी वाहन उभे करून निघून जाते. जूना पूल बंद असल्याने वाहतूक नवीन पुलावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पूलावर वाहतूक कोंडी होत असते. तर दुसरीकडे जुना पूल दुरूस्त होत नाही आणि तरी देखील बंद ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पूलाला लागूनच पुर्वेकडे स्मशानभूमी असून त्याच्या बाजूला एक गॅरेजवाला आहे. या गॅरेजवाल्याने आपल्या कडे दुरु स्तीसाठी आलेल्या गाड्या सर्रास पणे या पुलावर जाणाऱ्या मार्गावर चढणीवर पार्क केलेल्या आहेत. तसेच पुलाच्या पश्चिम दिशेलाही पंचवटी हॉटेलजवळही पुलावर अनिधकृत रित्या वाहने पार्क केलेली पहायला मिळत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार