शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे पूल हलक्या वाहनांसाठी सुरूच

By admin | Updated: September 15, 2016 02:07 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या गर्डरला तडा गेल्याप्रकरणी अद्याप विविध तपासणी अहवाल प्रलंबित आहे.

मीरा रोड : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे पुलाच्या गर्डरला तडा गेल्याप्रकरणी अद्याप विविध तपासणी अहवाल प्रलंबित आहे. यामुळे पुलाची कशा पद्धतीने व कधीपासून दुरुस्ती करायची, याचा निर्णयच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास घेता आलेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनीही हलक्या वाहनांसाठी पूल खुला ठेवण्याचे सूचित केल्याने नागरिकांना तूर्तास दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पुलाचे मूळ नकाशे प्राधिकरणाला मिळाल्याने प्राधिकरणाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. वसई खाडीवर असलेल्या जुन्या पुलाच्या बांधकामास सुमारे ५० वर्षे झाली आहेत. १९६४ मध्ये भूमिपूजन होऊन काम सुरूझाले, तर १९७३ मध्ये त्याचे उद्घाटन झाले. नवीन पूल बांधल्यानंतर वसई-विरार ते थेट गुजरात व मुंबई-ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने नव्या पुलावरून येतात. वसई-विरार, गुजरातकडे जाणारी वाहने जुन्या पुलावरून जातात. दरम्यान, एका गर्डरला तडा गेल्याने डिसेंबर २०१३ ते जून २०१४ दरम्यान जुना पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. त्यानंतर, या पुलावरून १५ टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना प्रवेश बंद करावा, असे प्राधिकरणाने सांगितले होते. पण, प्रत्यक्षात त्याचे पालन झाले नाही. पूल बंद असताना अवजड वाहनांची वाहतूक भिवंडी, वाडामार्गे वळवण्यात आली. पण, नवीन पुलावरून दोन्ही बाजंूनी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवली होती. तरीदेखील कोंडी होऊन तास, दोन तास लागत असल्याने आता पुन्हा पूल बंद होणार, हे ऐकून नागरिकांसह वाहनचालक व पोलीस यंत्रणाही धास्तावली. जुन्या पुलाच्या गर्डरला तडा गेल्याचे कळताच प्राधिकरणाने तातडीने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना पत्र देऊन पुलाचा वापर त्वरित बंद करण्यास कळवले होते. महाड पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच वरसावे पुलाची धास्ती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी जुना पूल १५ सप्टेंबरपासून बंद करण्याची व अवजड वाहने भिवंडीमार्गे वळवण्याची अधिसूचना काढली. शिवाय, हलक्या वाहनांना २० किलोमीटरपेक्षा कमी वेगाची मर्यादा घालण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना जुन्या पुलावरून प्रवेश आधीच बंद केला आहे. ७५ पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन अवजड वाहने वळवण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता तैनात केले आहेत. जुन्या पुलाच्या मूळ बांधकामाचे महत्त्वाचे नकाशे सापडत नसल्याने बांधकामाची माहिती व दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यास अडचण होत होती. आता ते नकाशे उपलब्ध झाल्याचे प्राधिकरणाने सांगितले. पुलाच्या गर्डरला मोठा एकच तडा गेलेला आहे. त्याची पाहणी दिल्ली व गुजरातहून आलेल्या तज्ज्ञांंच्या पथकाने केली आहे. आणखी एक पथक १६ सप्टेंबरला येणार आहे. पुलासाठी वापरलेले काँक्रिट व आत वापरलेल्या लोखंडाची सध्याची क्षमता तपासण्याचा सल्लाही तज्ज्ञांंनी दिला आहे. परंतु, त्यासाठी लागणारी यंत्रणा फारच मर्यादित आहे. महाड दुर्घटनेनंतर देशभरातील जुन्या पुलांची तपासणी सुरू झाल्याने वरसावे पुलाच्या तपासणीसाठी आवश्यक यंत्रणा लवकरात लवकर मिळवण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)