शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

काळू नदीवरील पुलाचे काम संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:42 IST

ग्रामस्थ संतप्त : शहापूर, मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटणार

किन्हवली/ मुरबाड : शहापूर-मुरबाड रस्त्यावरील काळू नदीचा धोकादायक पूल दोन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यावरील नवीन पुलाचे बांधकाम नव्याने सुरू आहे. मात्र, संथगतीने सुरू असणाऱ्या या पुलाचे बांधकाम पावसाळ्याआधी होण्याची शक्यता नसल्याने शहापूर तसेच मुरबाड तालुक्यांचा संपर्क चार महिने तुटणार असल्याने येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.

नाशिकवरून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला जोडण्यासाठी शहापूर-मुरबाड-म्हसा-कर्जत-चौकफाटा असा नवीन राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. याआधी शहापूर तालुक्यातून मुरबाडला जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे यांच्या ताब्यात होता. या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाल्याने, या रस्त्याची मालकी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे गेली. सा.बां. विभाग आणि एमएसआरडीसीच्या वादात काळू नदीवरील हा पूल दोन वर्षांपासून अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलावरून फक्त चारचाकी, दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती.

यावर्षी जानेवारी महिन्यात या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळेस काळू नदीवरील संपूर्ण पूल स्फोटकाच्या साहाय्याने उडवून लावत येथील वाहतूक थांबवली. पुलापासून दोन किमी अंतरावरील काळू नदीच्या पात्रामधून दगड टाकत वाहतुकीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, काळू नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम होणे शक्य नाही. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या शेकडो ग्रामस्थांना मुरबाड-शहापूर प्रवासासाठी सरळगावमार्गे लांबचा रस्ता अवलंबावा लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.काळू नदीवरील पुलाचे काम माझ्याकडे १५ दिवसांपूर्वीच आले असून आता दिवसरात्र काम सुरू आहे. या कामाची मुदत डिसेंबरपर्यंत असून लवकरात लवकर हे काम पूर्ण करून रहदारीसाठी पूल खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाळ्यात रस्त्यासाठी आणखी काही पर्याय देता येईल का, याबाबत आमचा विचार सुरू आहे - एस.के. गोसावी, उपअभियंता, एमएसआरडीसी

टॅग्स :palgharपालघर