बोईसर : येथील नवापूर नाक्यावरील एका बँकेतून काढलेली पावणे दोन लाख रुपये गाडीत ठेवून सुयश घरत हे समोरच्या दुकानात खरेदीसाठी गेले. असता काही मिनीटातच काच फोडून पैशांची बॅग काही जणांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास लुटून नेली. तर अशाच स्वरुपाची घटना २७ मे रोजी ओस्तवाल एम्पायर मध्ये घडली होती.तारापूर एमआयडीसी मधील एका कंपनीच्या कामगाराचा पगार देण्यासाठी सुयश घरत यांनी तामिळनाडू मर्र्कंटाईल बँकेतून पावणे दोन लाख रुपये काढले होते. तर अवघ्या मिनीटातच तसेच प्रचंड रहदारी असलेल्या रस्त्यावर ही घटना घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येते. तर एका दुकानातील सी.सी.टीव्हीचे फुटेज हे कारच्या समोरच्या भागापर्यंत दिसत असल्याने चोर काच फोडताना सीसीटीव्हीमध्ये दिसत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे. तर या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
बोईसरला कारची काच फोडून पावणे दोन लाख रुपये लुटले
By admin | Updated: October 14, 2015 02:16 IST