शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मालजीपाड्यातील घरात गावठी दारू जप्त; बायको, मुलाला अटक : नवरा फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:51 IST

वालीव पोलिसांनी मालजीपाडा येथील एका घरावर छापा मारून दारुच्या मोठ्या साठ्यासह दारु बनवण्यासाठी लागणारे रसायन व सामग्री जप्त केली.

विरार : वालीव पोलिसांनी मालजीपाडा येथील एका घरावर छापा मारून दारुच्या मोठ्या साठ्यासह दारु बनवण्यासाठी लागणारे रसायन व सामग्री जप्त केली. याप्रकरणी नवरा, बायको आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बायको आणि मुलाला ताब्यात घेतले असून नवरा मात्र फरार झाला.मालजीपाडा आणि ससूनवघर परिसरात गावठी दारू तयार केली जात असल्याचे वालीव पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर पुन्हा एकदा उजेडात आले आहे. पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी आज सकाळी आपल्या पथकासह भरत जनार्दन राऊत (४२) यांच्या घरावर छापा मारला. यावेळी घरात पाचशे लिटर गावठी दारू सापडली. ११ ट्यूब आणि २५ ड्रममध्ये हा साठा दडवून ठेवण्यात आला होता. याची किंमत पंचवीस हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन आणि सामुग्री पोलिसांनी जप्त करून जागावरच नष्ट केली.छापा पडल्यानंतर भरत राऊत पसार झाला. पोलिसांनी अवैध दारू विक्री व साठा केल्याप्रकरणी भरतसह त्याची पत्नी गीता राऊत (३८) आणि मुलगा हर्षद राऊत (१९) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गीता आणि हर्षदचा घरीच ताब्यात घेतले.यापूर्वी मालजीपाडा, ससूनवघर परिसरातील अ़नेक दारुचे अड्डे उध्वस्त केले आहेत. ससूनवघर आणि मालजीपाडा परिसरात खाडीलगत आणि तिवरांच्या जंगलात गावठी दारू बनवण्याचे अनेक अड्डे आहेत. पोलीसांना या परिसरात कारवाई करताना दलदलीचा भाग असल्याने अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे गावठी दारू बनवणारे हाती लागत नाहीत. ही दारू वसई विरारसह हायवेमार्ग मुंबई आणि उपनगरात विकली जाते.