शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बांधावरील तूरलागवड शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

By admin | Updated: February 5, 2017 02:13 IST

येथील शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतकऱ्यांकडून तुरीची मोठयÞा प्रमाणात लागवड करण्यात आली होती.

- राहुल वाडेकर, विक्रमगडयेथील शेतकऱ्यांकडून भात हे मुख्य पीक घेतले जात असले तरी या वर्षीच्या खरीप हंगामात येथील शेतकऱ्यांकडून तुरीची मोठयÞा प्रमाणात लागवड करण्यात आली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात काही दिवसा पासून तुरीच्या दरांनी उसळी घेतली असली तरी शेतकऱ्यांना तसेच काही वस्त्यांना स्वस्त तूरडाळ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दर वर्षी खरीप हंगामात मोठयÞा प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करण्यास कृषी विभागा कडून प्रोत्साहन देण्यात येते. तुरीतील पोषक घटकांमुळे कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते. त्यामुळे आदिवासी तालुका असलेल्या विक्रमगडमध्ये अतिरिक्त डाळीची विक्री करून त्याचा आर्थिक फायदा घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करीत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भात शेतीमध्ये उत्पादन खर्च जास्त तर पैसे कमी मिळतात. त्यामुळे शेतकरी तूर लावतात. कृषी विभागाच्या विशेष प्रयत्नांंद्वारे गेल्या पाच सहा वर्षा पासून शेतकऱ्यांना तूर, कडवे वाल, हरभरा व उडीद लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांना त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहेत. बांधावरील खाचरातील लागवड फायद्याचीतूर लागवडीसाठी मोठी विस्तृत जागा लागत नाही. शेताच्या बांधावर, माळरानावर या पिकाची लागवड करून भातशेती करणारे शेतकरी तुरीचे आंतरपीक घेऊ शकतात. हे पीक ओसाड माळरान, बांधावर, खाचरावर घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात जागेची बचत होते. त्याच प्रमाणे या पिकावर जास्त प्रमाणात किड-रोग येत नाहीत. खताची जास्त आवश्यकता नसते. त्यामुळे आंतरपीक म्हणून याची लागवड केल्यामुळे भातपिकाच्या बांधावर वाढणारी तण, गवत यांच्यावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे भाताचे पिकाचे उत्पन्न बरोबर दुबार पिक घेण्यास मदत होत.तालुक्यात तूर, मूग, उडीद आदी कडधान्याच्या एकूण क्षेत्रात वाढ होत आहे. तालुक्यात भरडधान्याच्या लागवड क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी तूर, मूग, उडीद या पिकांचे उत्पन्न घेण्यास शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येते. कडधान्यांच्या उत्पादकतेत शाश्वत वाढ करणे, जमिनीची सुपिकता व उत्पादकता राखणे, शेतीची अर्थव्यवस्था सुधारून शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे हा मुख्य उद्देश आहे. - दिलीप ढेंबरे, तालुका कृषी अधिकारी (विक्र मगड)दर वर्षी आम्ही खाचरात किवा बांधावर खरीपात तूरीची लागवड करतो. या पिकाला कमी खत लागते त्याच प्रमाणे इतर पिकांच्या मानाने रोगांचा परिणाम होत नाही. त्यामुळे भात पिका बरोबर तुरीचेही दुबार पिक घेता येते तुरडाळीचा भाव वाढीच्या काळात आम्हाला घरच्या घरी तूर डाळ उपलब्ध होते. - बबन सांबरे, शेतकरी (ओंदे, विक्र मगड)