शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंगवरून बोईसर-कोलवडे आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:11 IST

शेतक-यांसाठी असलेल्या रस्त्यावर दुतर्फा टाकण्यात येणारा घन कचरा आणि त्यातून येणारी दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या कोलवडे

बोईसर : शेतक-यांसाठी असलेल्या रस्त्यावर दुतर्फा टाकण्यात येणारा घन कचरा आणि त्यातून येणारी दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या कोलवडे ग्रामपंचायतीने बोईसरसह इतर ग्रामपंचायतींना कचरा टाकण्यास विरोध केला असून १ आॅक्टोबर पासून डम्पिंग ग्राऊंडचा रस्ताच बंद केला आहे. या प्रकारामुळे बोईसरसह इतर ग्रामपंचायत परिसरात कचरा साठून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत ग्रामपंचायत कचरा उचलू शकणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.बोईसर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोणताही औद्योगिक कारखाने नसले तरी येथील नागरी घन कचरा बोईसर ग्रामपंचायत कोलवडे ग्रामपंचायतीच्या हद्दित असलेल्या एमआयडीसीच्या जागेत टाकता. परंतू मागील एक वर्षापासून ग्रामपंचायत कोलवडे यांनी सदर ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर लोखंडी गेट उभा करून अधून मधून लॉक लाऊन कचरा टाकण्यास मज्जाव केला आहे. त्यानंतर १ आॅक्टोबर २०१७ पासून या ठिकाणी गेटला लॉक लाऊन कचºयाच्या गाड्या जाण्याचा मार्गच बंद करण्यात आला आहे.४ सप्टेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कोलवडे ग्रामपंचायतीने संबधीत ग्रामपंचायतीना ३० सप्टेंबर पर्यंत मुदत देऊन तो पर्यंत पर्यायी व्यवस्था करा अन्यथा १ आॅक्टोबर पासून गेट बंद करून कचरा टाकण्यास मज्जाव करण्या संदर्भातील पत्र पालघरच्या तहसीलदाराना दिले होते. दरम्यान, २ आॅक्टोबर रोजीच्या बोईसर येथील ग्रामसभेत डंम्पिंग ग्राऊंड चा मार्ग मोकळा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार