शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

बोईसर-चिल्हार रस्ता :चौपदरीकरणात सुरक्षितता धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:17 IST

तारापूर एम.आय. डी .सी. ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा बोईसर - चिल्हार फाटा रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करतांना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याने अपघातांची मालिका घडण्याची शक्यता आहे.

- पंकज राऊत बोईसर : तारापूर एम.आय. डी .सी. ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा बोईसर - चिल्हार फाटा रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम करतांना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्याने अपघातांची मालिका घडण्याची शक्यता आहे.तारापूर अणूऊर्जा केंद्र, बी.ए.आर.सी., तारापूर एम.आय.डी .सी. या महत्वाच्या प्रकल्पांबरोबरच बोईसर सह अनेक गावांना जोडणारा बोईसर -चिल्हार फाटा हा रस्ता महत्वाचा आहे. त्यावरुन अहोरात्र प्रचंड अवजड वाहनां बरोबरच हलकीवाहने व कारचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते.अनेक अडथळ्यांवर मात करून या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यांत आले आहे. परंतु या फाट्यापासून बोईसरकडे येणाºया रस्त्यावरील डिव्हायडरचे दगड काही ठिकाणी कलंडले आहेत तर काही डिव्हायडर रस्त्याच्या कडेलाच धोकादायक अवस्थेतच पडू दिले आहेत. एखादे अवजड वाहन अथवा कार त्याला आदळून अपघात घेऊ शकतो.त्याच प्रमाणे - सुमारे दोन ते तीन कि. मी. पर्यंत डिव्हायडर उभारण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी साधारणत: दोन फूट रु ंद व अर्धा फूट खोलीचे खड्डे खोदून ठेवले आहेत त्यामध्ये कुठलीही रेडियमची पट्टी किंवा खूण तसेच अंधारात ते लक्षात येईल अशी सूचना लावलेली नाही. पाऊसाच्या पाण्याने ते खड्डे भरल्यावर ते दिसत नाहीत. त्यामुळे त्यात अत्यंत वेगाने जाणारे वाहनाचे टायर अडकून अपघात होऊ शकतो.अस्ताव्यस्त डिव्हायडर व डिव्हायडरसाठी खणलेल्या खड्ड्या बरोबरच जेथे चौपदरीकरणाचे काम संपून दुपदरी रस्ता सुरु होतो तेथे रात्रीच्या अंधारात दिसेल असा सूचना फलक किंवा रेडियमच्या पट्ट्यांच्या काही खुणा ठेवणे गरजेचे आहे कारण चौपदरीकरणाचा रस्ता संपला हे वाहनचालकांच्या लक्षात येणे आवश्यक असते. ते केलेले नाही. सध्या जे साधे प्लास्टिकचे बॅरिकेड ठेवले आहे त्यावर वाहने आदळल्याने तेही तुटलेल्या अवस्थेत आहेत.सुरिक्षततेच्या दृष्टीने या तिन्ही गोष्टीकडे एम.आय. डी .सी. च्या अधिकाºयांनी गांभीर्याने पाहून चौपदरीकरणाचे काम करणाºया कंत्राटदारांना त्वरित सूचना देऊन अस्ताव्यस्त पडलेले डिव्हायडर जागीच बसवून घ्यावेत तसेच खड्ड्यांच्या चोहो बाजूला त्यांची सूचना मिळेल अथवा ते लक्षात येतील अशी व्यवस्था करावी अशी जनतेची मागणी आहे.डिव्हायडरसाठी केलेल्या खड्ड्याच्या बाजूने पांढरा रंग लावलेले दगड किंवा वाळूने भरलेल्या प्लॅस्टिकच्या गोणी ठेवून त्यावर रेडियम लावणे गरजेचे आहे .तसेच चौपदरीकरण झालेला रस्ता संपतो तेथे मोठा रेडियमचा सूचना फलक लावला तर वाहनचालकांना सूचना मिळून अपघातांवर नियंत्रण ठेवता येईल तसेच संभाव्य जीवित व वित्तहानी होणार नाही याची गंभीर दखल एम आय डी सी प्रशासनाने घ्यावी व कंत्राटदाराकडून आवश्यक त्या सुधारणा करुन घ्याव्यात अशी ही अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे.डिव्हायडरसाठी खणलेल्या खड्ड्याच्या चोहो बाजूस व जेथे चौपदरी रस्ता संपतो तेथे वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात दिसेल असे सूचना फलक लावण्याबाबत कार्यवाही केली जाईल .- चंद्रकांत भगतउप अभियंता एमआयडीसी , तारापूरसुरक्षितते दृष्टिने महत्वाच्या गोष्टी धाब्यावर !मोठ्या अपघाताची शक्यताकळंडलेल्या डिव्हायडरच्या दगडा पासून धोकािव्हायडर उभारण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी खोदलेले खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रणदुपदरी रस्ता सुरु होतो तेथे रात्रीच्या अंधारात दिसेल अशा सूचना फलकाची गरज