शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बोअरस्फोटामुळे परशुराम मंदिराला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:52 IST

कूपनलिका, विहिरींचेही होत आहे नुकसान 

 

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : तालुक्यातील गुंजकाटी येथे श्रीपरशुरामाचे पुरातन व ऐतिहासिक मंदिर असून या मंदिराशेजारी असणाऱ्या दगडखाणीत दररोज बोअरस्फोट केले जात आहेत. या जोरदार धक्क्यांमुळे मंदिराला धोका निर्माण झाला असून गावातील ग्रामस्थांच्या घरांनाही तडे गेले आहेत. त्यातच विहिरी व कूपनलिकेचेही नुकसान होत असल्याने बोअरस्फोट बंद करण्याची मागणी गुंज येथील ग्रामस्थांनी वाड्याच्या तहसीलदारांकडे केली आहे.तालुक्यातील गुंज गावाच्या हद्दीत अनेक दगडखाणी असून या दगडखाणीत दगडाचे उत्खनन करण्यासाठी बोअरस्फोट केले जातात. एका बोअरस्फोटामुळे जास्त दगडाचे उत्खनन होत असल्याने दगडखाण मालक शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून बोअरस्फोटाची परवानगी नसतानाही स्फोट खुलेआमपणे करीत आहेत. त्यामुळे गुंज गावातील पुरातन मंदिराला तडा गेला असून ते पडण्याची भीती ग्रामस्थांनी तक्रारीत व्यक्त केली आहे.बोअरस्फोटामुळे भूगर्भात बदल होत असल्याने गावातील विहिरी कोसळून पडण्याची तर कूपनलिकेतील पाणी गायब होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली असून शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.पुरातन परशुराम मंदिराच्या सुरक्षिततेसाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या तक्रारींवर गुंज गावातील सुमारे ५२ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.दगडखाणीतील बोअरस्फोटामुळे माझ्या शेतावरील कूपनलिकेचे पाणी अचानक गायब झाल्याने आता मला भाजीपाला वगैरे लागवडीसाठी दुसऱ्या गावाचा आसरा घ्यावा लागला आहे.    - संजय भोईर, ग्रामस्थ, गुंज

चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.सुनील लहांगे, नायब तहसीलदार, वाडा