पारोळ : विरार पुर्व भागातील चंदनसार कातकरीपाडा या ठिकाणी नदीम शेख या तरूणाचा खुन करण्यात आला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली. कातकरीपाडा (चिंचपाडा) या ठिकाणी तो राहत होता. मंगळवारी पहाटे त्यांच्या शेजाऱ्याना तो मृत अवस्थेत त्यांच्या रूमसमोर दिसला. सदर घटनेची खबर पोलीसांना दिली असता विरार पोलीस घटनास्थळी दाखल होत त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याची तपासणी केली असता त्याच्या गळ्यावर काळी खूण आढळल्याने दोरीने गळा आवळून त्याचा खून केल्याचा पोलीसांनी अंदाज वर्तवला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या तपास सुरू आहे.
विरार चंदनसार येथे गळा आवळून तरूणाचा खून
By admin | Updated: November 4, 2015 00:25 IST