शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नाळा गावातील ४ मंदिरांच्या दानपेट्ट्या फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:25 IST

सलग दोन दिवस परिसरात घरफोड्या : यापूर्वीही झाल्या होत्या याच मंदिरात चोऱ्या

वसई : नालासोपारा पश्चिम येथील नाळा गावातील चार मंदिरातील दानपेट्या गुरूवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून फोडल्या. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

नाळा येथे अर्नाळा-वसई राज्य मार्गाला लागून श्रीराम मंदिर, श्री दत्त मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे असून, थोड्या आडमार्गावर देवीच्या वाडीतील निर्जन स्थानी ग्रामदेवता पद्मावती देवीचे मंदीर आहे. या चारही मंदिरात गुरूवारी सकाळी पूजाअर्चेसाठी ग्रामस्थ आले असता मंदिराचा कडी-कोयंटा उचकटून गाभा-यातील दानपेट्या फोडलेल्या आढळून आल्या. यातील श्रीराम मंदिरातील दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर चोरट्यांनी टाकली होती, तर श्री दत्त मंदिरातील दानपेटी चोरटे सोबत घेऊन गेले आहेत. या चारही मंदिरातील दानपेट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे सांगण्यात आले. तसेच या परिसरातील काही नागरिकांच्या महागड्या सायकलीही चोरीला गेल्या आहेत. याबाबत नालासोपारा पोलिस ठाण्यात श्री पद्मावती देवी मंदिर ट्रस्टकडून तक्रार दाखल केली असून पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

याच श्रीराम मंदिर व पद्मावती देवी मंदिरात पाच वर्षापूर्वीही चोरट्यांनी दानपेट्या फोडल्या होत्या, अशी माहिती श्रीपद्मावती देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी लोकमतला दिली.निर्मळ यात्रोत्सव काळात चोरीच्या प्रमाणात वाढदरवर्षी निर्मळ यात्रोत्सवाच्या कालावधीत चोरी व घरफोडीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या यात्रोत्सवाच्या काळात शेकडो लोक बाहेरगावाहून येऊन पंधरा दिवस मुक्काम करतात.यात विविध खेळण्यांची दुकाने,मोठे पाळणे, तसेच मनोरंजनाचे खेळ लावणारे बाहेरगावचे लोक येऊन राहत असतात. यातील काही लोक भुरट्या चो-या करीत असून पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरीकांकडून करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात भंगार विक्रेते येणा-यांवरही नागरिकांचा संशय आहे.

टॅग्स :Robberyदरोडा