शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

बोर्डीत पर्यटकांची धूम

By admin | Updated: December 29, 2015 00:08 IST

निळेशार पाणी, अथांग समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, कांदळवन, नारळ-चिकूच्या वाड्या, सुरूची गर्द हिरवाई आणि पश्चिम घाटाचे कोंदण लाभल्याने बोर्डी पर्यटनस्थळी सागरी, ग्रामीण व कृषी इ.

बोर्डी : निळेशार पाणी, अथांग समुद्रकिनारा, रुपेरी वाळू, कांदळवन, नारळ-चिकूच्या वाड्या, सुरूची गर्द हिरवाई आणि पश्चिम घाटाचे कोंदण लाभल्याने बोर्डी पर्यटनस्थळी सागरी, ग्रामीण व कृषी इ. पर्यटनाचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे देशभरातून पर्यटक बोर्डीत दाखल झाले असून त्यांचा ओघ सुरूच आहे. आगामी काळात नवीनवर्ष साजरे करण्याकरीता बोर्डी पर्यटकांनी गजबजली आहे.बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड इ. गावांना अथांग समुद्रकिनारा, नारळ-चिकूच्या वाड्यांसह सुरूंचे गर्दबनाचा ठेवा लाभला आहे. मऊशार वाळू, लांबच लांब चौपाटीवर चालणे, उंट व घोड्यांवरून भ्रमंती करणे हे उपलब्ध असले तरी या पर्यटनस्थळी बोटींग, पॅराग्लायडींग, बनाना रायडिंग, इ. चा अभाव आहे. मात्र निसर्गाने मुक्त उधळण केल्यामुळे आकर्षण वाढल्याचे अबाल-वृद्ध तसेच कपल्सचे म्हणणे आहे. बोरीगाव, रामपूर, कोसबाड या पश्चिम घाटात वसलेल्या गावांमध्ये कृषी, ग्रामीण व आदिवासी पर्यटन केंद्राचा विकास झाला आहे. सेंद्रीय शेती, गोठा, वाडी, पाडा संस्कृती आदिवासी कल्प, इ. प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. फुल व फळ रोपवाटीका, वन विभागाचे निसर्गउद्यान पाहता येते. असल्याने मुंबई, सुरत, अहमदाबाद इ. शहराप्रमाणेच परराज्यातील पर्यटक पसंती देताना दिसून येत आहेत. मागील काही वर्षापासून पर्यटकांची संख्या मात्र वाढत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात घोलवड पोलीसांना कसरत करावी लागणार आहे. मोकळ्या जागांना वाहनतळाचे स्वरूप येणार आहे.पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेबाबत उपाय अवलंबिले आहेत.- जी. बांगर, स. पो. निरीक्षक घोलवड