शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
4
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
5
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
6
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
7
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
8
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
9
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
10
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
11
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
12
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
13
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
14
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
15
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
16
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
17
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
18
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
19
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
20
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली

शहर एसटी बचाव आंदोलनातून भाजपा बाहेर

By admin | Updated: January 26, 2017 02:52 IST

१ जानेवारीपासून एसटीने शहरी बस वाहतूक बंद केल्यानंतर एसटी बचावचा नारा देत आंदोलनाला सुुुरुवात केलेल्या भाजपाने गुरुवारच्या मोर्च्यातून माघार

शशी करपे / वसई१ जानेवारीपासून एसटीने शहरी बस वाहतूक बंद केल्यानंतर एसटी बचावचा नारा देत आंदोलनाला सुुुरुवात केलेल्या भाजपाने गुरुवारच्या मोर्च्यातून माघार घेतली आहे. तो सरकारविरोधात असल्याचे कारण भाजपाने दिले आहे. दरम्यान १ एप्रिलपासून महापालिका परिवहन पर्यायी सेवा सुरु करणार आहे. राज्य सरकारने १ जानेवारीपासून एसटीची वसईतील शहरी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घेऊन वसईत एसटीची सेवा कायम ठेवावी, यामागणी एसटी बचाव आंदोलन समितीने गुुरुवारी वसईच्या तहसिल कचेरीवर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बचावसोबतच २९ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, वसईतील कायदा-सुव्यवस्था आणि एमएमआरडीएच्या आराखड्याला विरोध अशाही मागण्या मोर्च्याच्या वतीने करण्यात येणार आहेत. मागण्या पाहता हा मोर्चा सरकारविरोधात असल्याने भाजपाने मोर्चा सामील न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपाचे वसई विरार जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांनी दिली.एसटीची ग्रामीण भागात सेवा अविरतपणे सुरु रहावी, यासाठी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या दालनात एक बैठक संपन्न झाली. बैठकीला वसई विरार महापालिका आयुक्त सतीश लोखंडे, उपायुक्त किशोर गवस, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील, परिवहन आयुक्त, भाजपाचे सरचिटणीस राजन नाईक, उपाध्यक्ष मनोज पाटील, महापालिका परिवहनचे ठेकेदार मनोहर सकपाळ उपस्थित होते. बैठकीत महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी डेपो आणि स्टँड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने अनेक अडचणी येत असल्याची व्यथा मांडली. एसटीने विरार, नालासोपारा आणि नवघर एसटी स्टँडची जागा भाडेतत्वावर दिल्यास परिवहनची अतिशय चांगली सेवा देता येईल, अशी माहिती दिली. त्यावर नागपूर आणि नांदेडच्या धर्तीवर वसई-विरार महापालिकेला एसटी भाडेतत्वावर जागा देण्यास तयार असल्याची माहिती एसटीचे महाव्यवस्थापक आर. आर. पाटील यांनी दिली. त्यावेळी येत्या दोन महिन्यात महापालिकेच्या ताफ्यात नव्या ७० बसेस दाखल होत आहेत. त्यानंतर महापालिका एसटीपेक्षा चांगली आणि अविरत सेवा ग्रामीण भागात देईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त लोखंडे यांनी दिली. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून एसटी बंद होऊन महापालिकेची परिवहन सेवा सुुरु होणार आहे.बैठकीत भाजपाचे राजन नाईक यांनी चोवीस तास अविरत सेवा देणारी एसटी सुरु ठेवावी. सध्याची बससेवा ग्रामीण भागातच असल्याने शहरी बस वाहतूक हा शब्द काढून टाकावा अशी मागणी केली. मात्र, राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन महापालिका हद्दीतील बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला वसई विरार अपवाद होऊ शकत नाही, अशी माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, एसटीचा विषय निकाली निघाला आहे. मोर्चेकरांनी वसईतील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवून पोलीस खात्यावर आरोप केले आहेत. त्याचबरोबर २९ गावे आणि एमएमआरडीएचा आराखडाविषयीही मागण्या केल्या आहेत. त्यामुळे मोर्चा सरकारविरोधी असेच चित्र आहे. वसईतील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली नाही. वसईत पोलीस बळ कमी आहे. सरकारकडून पोलीस ठाणी वाढवण्याचा प्रस्ताव मान्य झाला आहे. त्यामुळे पोलीस बळ वाढणार असल्याने पोलीस यंत्रणा अधिक कार्यक्षम होणार आहे. २९ गावे महापालिकेत ठेवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर आता गुरुवारच्या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.