शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्याच्या पत्नीचा दुस-यांदा मृत्यू

By admin | Updated: March 3, 2017 08:56 IST

सुभाष साटम यांची पत्नी सुवर्णा साटम यांचा 28 एप्रिल 2003 मध्ये मृत्यू झाला होता

ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 3 - वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांच्या पत्नीचा दुस-यांदा मृत्यू झाला आहे. आता हे कसं काय शक्य आहे असं विचारणार असाल तर स्वत: जिल्हाध्यक्षांनीच दोनवेळा पत्नीचं मृत्यूपत्र तयार करुन हे सिद्ध केलं आहे. तसं पाहायला गेलं तर वसई-विरार महानगरपालिका आणि येथील स्थानिक नेत्यांचं वादाशी यांचं जुनं नातं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात याप्रकरणी लिखित तक्रार केली आहे.
 
वसई विरार भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी दुसऱ्या पत्नीच्या मदतीने व्यावसायिक गाळा विक्री करण्यासाठी बोगस दस्ताऐवज आणि पहिल्या पत्नीचे मृत्यूचे खोटे दाखले सादर केले असून, याप्रकरणात महापालिका आणि दुय्यम उपनिबंधकही सहभागी झाले आहेत. तसेच सरकारचा लाखो रुपयांचा महसूलही बुडवल्याची तक्रार  गोविंदा गुंजाळकर यांनी केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांची पत्नी सुवर्णा साटम यांचा 28 एप्रिल 2003 मध्ये मृत्यू झाला होता. ज्याचं प्रमाणपत्र महानगरपालिकेने दिलं होतं. मृत पत्नी सुवर्णा साटम यांच्या नावावर मौजे आचोळे येथे एक दुकान होतं. या दुकानाची किंमत जवळपास 34 लाख होती. सुभाष साटम यांनी खोटी कागदपत्रं तयार करुन कागदोपत्री पत्नीला जिवंत दाखवलं. त्यानंतर तिची संपत्ती विकून 15 ऑक्टोबर 2011 रोजी महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा मृत्यू प्रमाणपत्र तयार करुन घेतलं. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे. गुंजालकर यांनी तुळींज पोलीस ठाण्यात लिखीत तक्रार दिली असून सुभाष साटम यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.  मयत पत्नीला जिवित दाखवून हा व्यवहार करतांना साटम यांनी शासनाचीही आर्थीक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शासनाचा किमान दोन लाख रुपयांचा महसुल बुडवण्यात आला आहे. तर ३४ लाखांचा गाळा ३ लाखांना विक्री केल्याचे दाखवून साटम यांनी ३० लाख रुपयांचा अपहारही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.