शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने रद्द केलेल्या 50 टक्के करावर भाजप असमाधानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 23:34 IST

आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा : निवडणुकीआधीच तापले वातावरण

वसई : वसई-विरार महानगरपालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागले आहे. अलीकडेच परिवहन सेवेच्या उद्घाटनावरून बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले असताना, आता महापालिकेने ५० टक्के रद्द केलेल्या कराविषयी भाजपने असमाधान व्यक्त करीत संपूर्ण कर रद्द करा, अन्यथा आयुक्तांनाच घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. 

वसई-विरार महापालिकेने पालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना काही दिवसांपूर्वी ‘ट्रेड लायसन्स’ कर लावला होता. त्या संदर्भातील विरोधानंतर महापालिकेने करात ५० टक्के कपात केली आहे. मात्र, या सवलतीवर भाजप समाधानी नाही. भाजपने वसईमध्ये व्यापाऱ्यांची बैठक घेऊन हा कर रद्द करण्याची मागणी केली होती. भाजपने एका पत्रकाद्वारे व्यापाऱ्यांचा या करास विरोध असल्याची स्वाक्षरी मोहीम राबविली. त्यानंतर महापालिकेने करात ५० टक्के  सवलत दिली, परंतु त्यावर भाजप समाधानी नाही. भाजप जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी सांगितले की, पूर्वी विरारमधून तर आता ठाण्यातून वसई-विरार महानगरपालिकेचा कारभार चालत आहे. एका पक्ष कार्यलयाप्रमाणे कामे केली जात आहेत किंवा करून घेतली जात आहेत. 

हा कर अन्यत्र नाही, मग आम्ही का भरायचा?या अशा प्रकारामुळे भविष्यात महानगरपालिकेवरचा जनतेचा विश्वासच उडून जाईल, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. करात ५० टक्के कमी केल्याचे जे गाजर महापालिकेने दिले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. मुळात जो कर अन्यत्र कुठेच नाही, तो आम्ही का भरायचा? असा सवाल उत्तमकुमार यांनी केला आहे.

पालिका निवडणुकीसाठी भरत राजपूत सहप्रभारीपदी 

लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी कोरोना काळात डहाणू, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या आदिवासींना गुजरातमधून पुन्हा डहाणूत आणण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांना भोजनाबरोबरच घरपोच करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले वाहन याची दखल घेत, भाजपने राजपूत यांची वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सहप्रभारीपदी निवड केली आहे. यामुळे डहाणूच्या भाजप कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. मुंबईत महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक आयोजिली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजपूत यांची सहप्रभारीपदी नियुक्ती करून जबाबदारी सोपविली आहे. वसई-विरारमध्ये  उत्तर भारतीयांची लोकवस्ती जास्त आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून पक्षाने राजपूत यांची निवड केली आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार