शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

भाजपा, काँग्रेसमध्ये असे रंगले उमेदवारीचे नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 03:17 IST

उमेदवारी देण्यासाठी अथवा मिळविण्यासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये मोठे नाट्य घडून आले. त्यामुळेच गावीत भाजपामध्ये गेलेत. तर सवरांचे पुत्राला खासदारकीची उमेदवारी देण्याचे स्वप्न भंग पावले.

- नंदकुमार टेणी पालघर: उमेदवारी देण्यासाठी अथवा मिळविण्यासाठी काँग्रेस आणि भाजपामध्ये मोठे नाट्य घडून आले. त्यामुळेच गावीत भाजपामध्ये गेलेत. तर सवरांचे पुत्राला खासदारकीची उमेदवारी देण्याचे स्वप्न भंग पावले.काहीही झाले तरी आपल्यालाच उमेदवारी मिळावी अशी दामू शिंगडा यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीत आणि मुंंबईत फिल्डिंग लावली होती. तर दुसरीकडे राजेंद्र गावीत यांचेही पारडे बऱ्यापैकी जड होते. त्यामुळे उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार? हा प्रश्न होता. नव्या दमाचा उमेदवार द्यायचा असेल तर माझ्या पुत्राला उमेदवारी द्या असे शिंगडा यांचे म्हणणे होते. उमेदवारी निश्चित करावयाच्या आदल्या दिवसापर्यंत गावीत यांना उमेदवारी मिळणार असे चित्र असल्याने शिंगडा यांनी थेट राहुल गांधी यांनाच साकडे घातले. आपले ज्येष्ठत्व आणि पक्षनिष्ठा व गांधी घराण्याप्रती असलेली निष्ठा या गोष्टी पटवून दिल्या आणि त्यातून शिंगडांची उमेदवारी निश्चित झाली. हे कळताच गावीत यांनी भाजपामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवायचे ठरवले व त्याप्रमाणे घडून आले.भाजपामध्ये असेच पुत्रप्रेमाचे नाट्य रंगत होते. पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची भाजपाची उमेदवारी आपला सर्जन पुत्र हेमंत याला मिळावी, अशी विष्णू सवरा यांची इच्छा होती. त्यासाठी ते गळ टाकून बसले होते. ही पोटनिवडणुक आहे. निवड झालेल्या खासदाराची मुदत काही महिने असणार आहे. त्यामुळे नवा चेहरा भाजपाने आजमावून पहावा व त्यासाठी आपल्या पुत्राला उमेदवारी द्यावी, अशी त्यांची इच्छा होती. परंतु त्याला पक्षातूनच तीव्र विरोध होता. तुमच्या प्रभावाखाली असलेल्या वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तुमच्या हट्टासाठी तुमच्या कन्येला (निशा सवरा) उमेदवारी दिली तिला तुम्हाला विजयी करता आले नाही. या गावच्या नगरपंचायतीची निवडणूक जिंकता आली नाही. तुमचा मतदारसंघ असलेल्या विक्रमगड नगरपंचायतीच्या निवडणुकीतही तुम्हाला पक्षाला विजयी करता आले नाही तिथे विक्रमगड विकास आघाडी सत्तेवर आली. या पार्श्वभूमीवर तुमच्या पुत्राला उमेदवारी कशासाठी द्यायची?असे प्रश्न पक्षश्रेष्ठींनी विचारले. त्याचे कोणतेही उत्तर सवरांकडे नव्हते. त्यामुळेच मंत्रीपुत्राला उमेदवारी देण्यापेक्षा काँग्रेसमधून इम्पोर्ट केलेल्या गावीत यांना उमेदवारी देणे भाजपाने पसंत केले. त्यामुळे सवरांची पुत्रप्रेमाची खेळी अपयशी ठरली. शिवसेनेने वनगा यांना हायजॅक करून भाजपाचे नाक कापले होते. त्यामुळे गेलेली अब्रू काही प्रमाणात वाचविण्यासाठी भाजपाला अन्य पक्षातील मोठा मासा गळाला लावून दाखविणे भाग होते. त्यासाठी भाजपाने गावित यांना गळाला लावले. त्यामुळे उमेदवार पळवापळवीच्या खेळात आपण कमी नाही हे भाजपाला दाखवता आले.>.हेमंत हे फारसे परिचित नाहीत. अंबाडी येथील नवजीवन रुग्णालयात ते आॅर्थोपेडीक सर्जन आहेत. त्यांचा पॉलेटिकल होल्ड नाही. पक्षकार्यात त्यांचे फारसे योगदान नाही. अशा स्थितीत त्यांना उमेदवारी कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नव्हते. अशी उमेदवारी मिळविण्यासाठी जी जबरदस्त फिल्डिंग स्थानिक, राज्य व केंद्र पातळीवर लावावी लागते ती ही लावण्यात सवरा अपयशी ठरले. या उमेदवार निश्चितीत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याने व त्यांना गावीत यांनाच उमेदवारी द्यायची असल्याने गावितांचे पारडे जड ठरले.