शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बविआचे भाजपाशी बिनसले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:13 IST

अनेक परवानग्या शिल्लक असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपा नेत्यांनी सूर्या पाणी योजनेचे भूमिपूजन केले. प्रकल्पाचे नारळ तर सर्वच फोडतात, पण काम आमच्याशिवाय होणार नाही, असा खरमरीत इशारा बहुजन विकास आघाडीचे नेते व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : अनेक परवानग्या शिल्लक असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपा नेत्यांनी सूर्या पाणी योजनेचे भूमिपूजन केले. प्रकल्पाचे नारळ तर सर्वच फोडतात, पण काम आमच्याशिवाय होणार नाही, असा खरमरीत इशारा बहुजन विकास आघाडीचे नेते व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांना दिला.बविआच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. बविआमुळेच मेहता व जैन महापौर झाल्याचा दावा त्यांनी केला आणि येणारा महापौरही आमच्याशिवाय बसणार नाही, असे सूचित केले. त्यांच्या या इशाºयामुळे बविआ आणि भाजपात बिनसल्याचे व त्यांच्यातील समझोत्याची चर्चा बंद झाल्याचे मानले जाते. तसे झाल्यास बहुजन विकास आघाडी सर्व जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जाते.मीरा-भार्इंदरसाठी २१८ दशलक्ष लीटर पाणी पुरवणाºया सूर्या योजनेचे भूमिपूजन ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ही योजना वसई-विरारसह मीरा-भार्इंदरसाठी असतांना त्याचे ठाकूरांना निमंत्रणच नव्हते. भाजपा आ. नरेंद्र मेहतांकडून पालिका निवडणुकीतील बविआसोबतच्या युतीसाठी सतत ठाकूरांच्या दरबारात हजेरी लावली जात असतांनाही ठोस निर्णय होत नसल्याने शहरातील बविआचे इच्छुक हवालदिल आहेत.या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथील बविआच्या कार्यकर्ता व इच्छुकांच्या मेळाव्यात ठाकूर काय बोलतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे ठाकुरांनी भाजपासह थेट मुख्यमंत्री व मेहतांना लक्ष्य करत टोले लगावले. सूर्या पाणी योजनेची कोणाला माहिती तरी आहे का? मीरा- भार्इंदरमधील नेत्यांनी जाहीरपणे व्यासपीठावर याबाबत माझ्याशी चर्चेची तयारी दाखवावी. तसे असेल तर मीरा भार्इंदरला जलवाहिनी वेगळी देणार का? महामार्ग, वन विभाग आदींच्या परवानग्या मिळाल्या नसताना नारळ कसले फोडता? आदिवासींच्या व खाजगी जमिनींमधून जलवाहिनी जाणार आहे तो प्रश्न सोडवलाय का? असे प्रश्न ठाकूर यांनी विचारले. ठाकूर यांचे प्रकल्पाबाबतचे चर्चेचे आव्हान आ. मेहता यांनी स्वीकारल्याची चर्चा आहे.आज सूर्याचे नारळ फोडले. उद्या मेट्रोचे फोडतील. अगदी विमानतळाचे नारळसुध्दा फुटतील, असा चिमटा त्यांनी काढला. नारळ कोणीही फोडले तरी मीरा-भार्इंदरला सूर्याचे पाणी आम्हीच देणार आहोत, असा दावा त्यांनी केला. आमच्या नगरसेवकांची संख्या किती याचा विचार करु नका. २००७ साली दोन नगरसेवक असताना मेहता महापौर झाले ते बविआमुळे. आता भाजपाच्या गीता जैन महापौर झाल्या त्यादेखील बविआच्या मदतीमुळे. नगरसेवकांची संख्या कमी असली, तरी आमच्याशिवाय महापौर बसणार नाही, असे ठाकूर यांनी सुनावले.