शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पालिका उमेदवारीसाठी बविआमध्ये मोठी स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:14 IST

आगामी वसई-विरार महानगरपालिका निवडणूक 

प्रतीक ठाकूरलोकमत न्यूज नेटवर्कविरार : वसई-विरार महानगरपालिका परिवहन सेवा उद्घाटनाच्या निमित्ताने वसई-विरार महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ अप्रत्यक्ष फुटला आहे. बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पालिकेच्या नवीन परिवहन सेवेचा शुभारंभ केल्यानंतर शिवसेनेने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सेवेचे रीतसर उद्घाटन करून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, सत्ताधारी बहुजन विकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा पाहायला मिळत आहे.वसई-विरार महापालिका निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यांत लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिवहन सेवा उद्घाटनाच्या निमित्ताने याची चिन्हे राजकीय आखाड्यात दिसून आली आहेत. वसई-विरार महापालिकेच्या बहुतेक सर्वच प्रभागांत आरक्षण बदलले असल्याने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या तुलनेत बविआची राजकीय ताकद मोठी आहे. त्यामुळे या पक्षाची उमेदवारी देताना खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे बविआ नेतृत्व जुन्या-जाणत्या नेत्यांना इतर प्रभागांत संधी देत त्यांचे पुनर्वसन करते की, त्या प्रभागात कार्यरत जुन्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेते, याकडे बविआतील नेत्यांसह वसई-विरारकरांचे लक्ष लागले आहे.वसई-विरार महापालिकेत १०९ नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे तर अन्य पक्षाचे अवघे सहा नगरसेवक होते. मागील वर्षी महिलांसाठी ५० टक्के आरक्षण होते. या वेळीदेखील हे आरक्षण कायम असले, तरी प्रभाग आरक्षण मात्र बदलले आहे. विशेष म्हणजे ज्या माजी नगरसेवक अथवा नगरसेविकेचे प्रभाग आरक्षण बदलले आहे, ज्यांना बविआने एखादी तरी संधी यापूर्वी दिली आहे, अशा कुणाही प्रभाग बदललेल्या माजी नगरसेवक अथवा नगरसेविकेने इतर प्रभागांत आपला शिरकाव करून घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी प्रत्येक प्रभागातील पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असे प्रभाग बदललेले माजी नगरसेवक-नगरसेविका किमान एक टर्म 'नगरसेवक' या पदाशिवाय केवळ पक्ष कार्यकर्त्याच्या भूमिकेत कितपत कार्यरत राहू शकतात, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.