शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावांतील भूमिपुत्र तहानलेले; समस्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:21 IST

पर्यावरण संवर्धन समितीचे साेमवारपासून उपाेषण

वसई : बारा वर्षांपासून रखडलेली ६९ गावांतील पिण्याच्या पाण्याची योजना त्वरित चालू करून भूमिपुत्रांची तहान भागवावी, तसेच परिवहनसेवा व बुडणारी वसई या प्रमुख समस्यांवर वसई-विरार शहर महापालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरारतर्फे समन्वयक समीर वर्तक आणि सामाजिक कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे हे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.मागील १४ वर्षांपासून पिण्याचे पाण्याचा प्रश्न सातत्याने मांडत आहाेत. मात्र, दरवेळी आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. अखेर काेविडचे संकट असतानाही नाइलाजाने आम्हाला हा बेमुदत उपाेषणाचा मार्ग निवडावा लागल्याचे वर्तक यांनी सांगितले. २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता वाघोली, मांडलय व सोजआळीच्या वेशीवर असलेल्या रिकाम्या पाण्याच्या टाक्यांखाली आणि बाजूच्या बंद असलेल्या परिवहनसेवेच्या बसस्टॉपजवळ हे उपाेषण करण्यात येणार आहे. वसई ग्रामीण भागातील ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना डिसेंबर, २००८ मध्ये मंजूर होऊन आणि फेब्रुवारी, २००९ मध्ये भूमिपूजन झाले हाेते. मात्र, ही योजना राजकीय हेतूने अद्याप राबविलेली नाही. त्यास प्रशासनाचाही छुपा पाठिंबा आहे, तर ४ जून, २०१९ रोजी या संदर्भात आंदोलनही केले हाेते. तेव्हा पालिकेने ६९ गावांत पाणी योजनेची आवश्यक नळजोडणी केलेली असून, मुबलक पाणी देण्यात आल्याचे पत्र दिले हाेते. मात्र, त्यानंतर दीड वर्षे उलटूनही अद्याप पाण्याचा ठणाणा कायम आहे. किमान चार ते पाच वर्षांपासून जनवाहिन्या व इतर काम झाले असून, लवकरच लवकरच पाणी मिळणार या आश्वासनापलीकडे काहीच हाती लागलेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.परिवहनचा खेळखंडोबावसईतील एसटीसेवा पालिका परिवहनसेवा देणार म्हणून बंद करण्यात आली. मात्र, काेराेना काळात नागरिकांना गरज असताना, पालिकेची परिवहनसेवा बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कामगार वर्गाला तुजपुंज्या उत्पन्नातून राेज १०० ते १२० रुपये खासगी प्रवासावर खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे एसटी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात येणार आहे.