शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी सिलिंडर स्फोट; जखमींमधील आणखी एकाचा मृत्यू , मृतांची संख्या ३ वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 17:42 IST

अशा दुर्दैवी घटनेत निष्पापांचे बळी जात असून त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे . 

भिवंडी: वळ ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या जे ई मेकॅनिकल कंपनीत लोखंड कापण्याचे काम करीत असताना नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट होऊन झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे . या घटने बुधवारी दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी झाले होते . मात्र यातील गंभीर जखमी युवकाचा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला असल्याने मृतांचा आकडा तीन वर पोहचला आहे तर जखमी असलेल्या तिघांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अल्पेश भोईर असे मृत्यू झालेल्या तिसऱ्या कामगारांचे माव असून त्यास उपचारासाठी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र रात्री उपचारादरम्यान अल्पेशचा मृत्यू झाला आहे . 

तालुक्याच्या ग्रामीण भागात असंख्य गोदमातून असे अनधिकृत व्यवसाय उद्योग चोरी छुपे कोणत्याही शासकीय परवाणग्यांशिवाय सुरू असून त्याकडे संबंधित शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष आहे त्यामुळे हे अवैध उद्योग सुरू असताना त्याची नोंद कोणत्याही शासकीय यंत्रणे कडे नसल्याने अशा दुर्घटना झाल्या नंतर फक्त चर्चा होते परंतु कोणतीही कारवाई होत नाही . त्यामुळे येथील व्यावसायिकांचे फावते आहे. मात्र अशा दुर्दैवी घटनेत निष्पापांचे बळी जात असून त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे . 

दरम्यान कामगार युवकांच्या मृत्यूस कंपनी मालक व व्यवस्थापक जबाबदार असून जे ई मेकॅनिकल कंपनी व्यवस्थापना वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत कामगार हे युवक असल्याने त्यांच्या कुटुंबियां वर उपासमारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याने त्यांना तात्काळ आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी नगरसेवक निलेश चौधरी यांनी भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तर या कंपनीत स्टील कटिंग करण्याचे काम करीत असताना प्रमाणा पेक्षा जास्त नायट्रोजन गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला असल्याचे समोर आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर गॅस साठा करण्याचा परवाना कंपनी कडे होता का , कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व उपाय योजना केली होती का त्यामुळे या कामगारांच्या जीवाशी कंपनी मालक खेळत असून त्यातूनच तीन निष्पाप कामगारांचा जीव गेल्याने कंपनी मालक विरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी देखील निलेश चौधरी यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी