शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या डंपिंगची आग आटोक्यात पण धूर निघणे सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2023 20:18 IST

शनिवारी रात्री उत्तनच्या डंपिंगवर गेल्या अनेकवर्षां पासूनच कचरा प्रक्रियेविना पडून असून तेथे कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डंपिंग ग्राउंड मध्ये निर्माण झालेल्या कचऱ्याच्या डोंगराला शनिवारी रात्री लागलेली आग रविवारी आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश मिळाले आहे . मात्र आग अजूनही आत मध्ये धुमसत असून धुराचे लोट निघत असल्याने आग पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत . 

शनिवारी रात्री उत्तनच्या डंपिंगवर गेल्या अनेकवर्षांपासूनच कचरा प्रक्रियेविना पडून असून तेथे कचऱ्याचा डोंगर निर्माण झाला आहे.  ह्या कचऱ्याच्या डोंगरास सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडत असल्याने घातक धूर व प्रदूषणाने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत . 

शनिवारी रात्री लागलेली आग भीषण असल्याने महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ८ अग्निशमन बंब , सुमारे ६ टँकर व सुमारे ४० अधिकारी आणि जवानांनी रात्रभर आग विझवण्यासाठी प्रयत्न चालवले होते. पाण्याचे सुमारे ६० पेक्षा जास्त टँकर आता पर्यंत आग विझवण्यासाठी मारण्यात आले आहेत असे सांगण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, पालिका उपायुक्त मारुती गायकवाड व रवी पवार, अतिरिक्त शहर अभियंता व घनकचरा प्रकल्प विभागाचे प्रमुख सुरेश वाकोडे, अग्निशमन मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे, अग्निशमन केंद्र अधिकारी जगदीश पाटील व दिलीप रणवरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन आगीची पाहणी करत आढावा घेतला. 

आग आटोक्यात आली असली तरी कचऱ्याच्या डोंगराच्या आतील भागातील आग अजूनही पूर्णपणे विझलेली नाही . जेणे करून मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे . आग पूर्णपणे विझवण्यासाठी पोकलेन व जेसीबीने कचरा विस्कळीत करून पाणी मारले जात आहे . रविवारी सायंकाळ पर्यंत अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान आग पूर्णपणे विझवण्याच्या कामात गुंतलेले होते . 

 कचऱ्यातुन मिथेन वायू निर्माण होत असल्याने आग लागत असल्याचा दावा प्रशासना कडून केला जात आहे . तर  कचऱ्याचा डोंगर कमी करण्यासाठी आगी लावल्या जातात  . येथे अनेक वर्षांचा प्रक्रिया न करता बेकायदा टाकलेला कचरा असून मिथेन वायूचे कारण पुढे करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी  कमी केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत