शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भाटेबंदरला उद्यापासून वेलंकनी यात्रा

By admin | Updated: August 28, 2016 03:54 IST

येथील उत्तनच्या भाटेबंदर समुदकिनारी वसलेल्या ख्रिस्तींच्या वेलंकनीमातेच्या यात्रेला सोमवार, २९ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही यात्रा १२ दिवस चालणार असल्याची

भार्इंदर : येथील उत्तनच्या भाटेबंदर समुदकिनारी वसलेल्या ख्रिस्तींच्या वेलंकनीमातेच्या यात्रेला सोमवार, २९ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. यंदा ही यात्रा १२ दिवस चालणार असल्याची माहिती तीर्थमंदिर सुकाणू समितीचे अध्यक्ष रेनॉल्ड बेचरी यांनी दिली.यात्रेचा प्रारंभ मुंबई सरधर्मप्रांताचे बिशप अ‍ॅग्नेलो ग्रेशियस यांच्या उपस्थितीत होईल. या वेळी परंपरेनुसार वेलंकनीमातेची पालखी परिसरातील दर्यामाता चर्चमधून निघून ती तीर्थमंदिरात आणली जाणार आहे. त्यानंतर, मंदिरात विधिवत वेलकंनीमातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिर आवारात २० फूट उंचीचे धार्मिक ध्वजारोहण केले जाईल. पुढील नऊ दिवस ध्वज सायंकाळी ५ वाजता दररोज फडकावला जाईल. यात्रेदरम्यान दररोज सकाळी ६ ते रात्री ८ वाजेदरम्यान मराठी, इंग्रजी, हिंदी, कोकणी, तामीळ अशा पाच भाषांत प्रार्थना (मिस्सा) होईल. त्यासाठी दोन बिशप व २६ प्रवचनकार धर्मगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रार्थनेदरम्यान १, ४ व ७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता समितीमार्फत मातेच्या पालखीची परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येईल. ४ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता ईस्ट इंडियन ख्रिस्तींची मराठी बोलीभाषेत विशेष प्रार्थना होईल. ८ सप्टेंबरला शेवटच्या दिवशी दिव्य सोहळ्यासाठी बिशप वॉस्को पेन्हा उपस्थित राहतील. मागील वर्षी १४ नोव्हेंबरला झालेल्या राष्ट्रीय ख्रिस्तशरीर संमेलन, २२ मे रोजीच्या जपमाळमातेचा मनोरा या सुंदर वास्तुशिल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला देशातील अनेक राज्यांतील भक्तांनी येथे हजेरी लावली होती. तसेच पोप यांच्या दूतांनीही या तीर्थमंदिराला अनेकदा भेटी दिल्या आहेत. (प्रतिनिधी) १२० वर्षांपासून वास्तव्य१२० वर्षांपासून मीरा-भार्इंदरमध्ये ईस्ट इंडियन ख्रिस्ती समाज वास्तव्यास आहे. त्यांनी अद्याप आपली मराठी मायबोली जपली आहे. मूळ मासेमारी व भातशेतीचा व्यवसाय असलेला हा समाज कालांतराने इतरत्र विखुरला गेला. परंतु, आजही उत्तनसह पश्चिम किनारपट्टीवर हा समाज आपले अस्तित्व टिकवून आहे.