शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पालघर उपनगराध्यक्षपदी उत्तम घरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:03 IST

दोन वर्षे सेनेला तर भाजपला तीन; नगराध्यक्षपद गेल्याने अजूनही घडी बसेना

पालघर : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेने कडून उत्तम घरत तर भाजप कडून लक्ष्मीदेवी हजारी या इच्छुकांनी भरलेल्या नामनिर्देशन पत्रा नंतर हजारी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने उत्तम घरत यांची एकमताने निवड झाली आहे.पालघर नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान सेना-भाजप युती प्रमाणे नगराध्यक्षपद सेनेकडे तर उपनगराध्यक्षपद भाजप कडे तसेच दोन विषय समित्या व दोन स्विकृत सदस्य भाजप कडे राहतील असे ठरल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र नगराध्यक्ष पदी महाआघाडी च्या डॉ. उज्वला काळे यांची निवड झाल्याने एकहाती सत्ता मिळवूनही नगराध्यक्ष पद हातचे गेल्याने सेने पुढच्या अडचणी वाढल्या होत्या.नगरपरिषदेत एकूण २८ नगरसेवक निवडून आले असून शिवसेना १४, भाजप ७, सेना बंडखोर ५ तर राष्ट्रवादी २ असे बलाबल राहिले आहे. तूर्तास तरी दोन वर्ष नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद उत्तम घरत सांभाळणार असून याआधीही उत्तम घरत यांनी पालघर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्षपद भूषिवलेले होते. सलग पाच टर्म ते नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.उपनगराध्यक्ष पाठोपाठ स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे अरु ण माने यांची पालघर नगर परिषदेमध्ये वर्णी लागली आहे. सेना-भाजपमध्ये ठरल्याप्रमाणे एकूण तीन स्वीकृत नगरसेवक घ्यावयाचे होते त्यापैकी दोन नगरसेवक हे भाजप तर एक नगरसेवक शिवसेना असे ठरले होते. मात्र शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कोण असतील याबाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्याची काळजी सेनेने घेतली. शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराने स्वीकृत नगरसेवक साठी अर्ज दाखल केला नसल्याने अजून शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक कोण हे निवडणुकी नंतर जाहीर होणार आहे. मात्र, त्याची चुरस सुरु झाली आहे.अखेर झाला समझोताआज उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सेने कढून उत्तम घरत तर भाजप कडून लक्ष्मीदेवी हजारी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.उपनगराध्यक्षपदी शिवसेना व भाजपामध्ये चढाओढ होती अखेर वरिष्ठांच्या समझोत्या नुसार पहिली दोन वर्षे शिवसेनेला मिळणार असून अन्य तीन वर्षांचा कालावधी भाजपला देण्यात येणार आहे.

टॅग्स :palgharपालघर