शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बविआच्या जाधवांना स्वातंत्र्य नाही, गावितांची खुर्चीसाठी धावाधाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:16 IST

वसईमध्ये करबटांचे टीकास्त्र; भूमिपूत्र बचाव आंदोलनाची जाहीर सभा

वसई : महाआघाडीचा मित्रपक्ष म्हणून बविआच्या उमेदवाराला आम. ठाकूरांना विचारल्या खेरीज स्वत:चे मत व कुठलेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यच नाही, तर दुसरीकडे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार खास. गावित हे केवळ खुर्चीसाठी वारंवार पक्ष बदलत असल्याने या दोघांवर पालघर जिल्ह्याचे मतदार कुठल्या मानसिकतेनं विश्वास ठेवणार असे परखड विचार भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे उमेदवार दत्ताराम करबट यांनी वसईच्या वाघोलीत मांडले. पालघर लोकसभेच्या मतदारसंघात प्रचार, जाहीर सभा व कॉर्नर सभाना आता भर उन्हात देखील कमालीचा वेग येताना दिसत असून एका पाठोपाठ एक अशा सर्व पक्षीय व संघटना यांच्या जाहीर सभा संपन्न होत आहेत.वसईच्या पश्चिम पट्टीत वाघोली गावाच्या माळीआळी येथे शुक्र वारी संध्याकाळी भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे पालघर लोकसभेचे उमेदवार दत्ताराम करबट यांची पहिली जाहीर सभा संपन्न झाली. या जाहीर सभेसाठी मंचावर भूमिपुत्र बचाव आंदोलनाचे उमेदवार दत्ताराम करबट, बुलेट ट्रेन विरोधी आदिवासींचे नेते काळुराम काका दोधडे, जेष्ठ विधिज्ञ नॉव्हेल डाबरे, शशी सोनावणे, पर्यावरण समनव्यक समीर वर्तक, दत्ता सांबरे, विधिज्ञ धनंजय चव्हाण, जेष्ठ सालू कजार, गोडसंन डायस, मेकेन्जी डाबरे व प्रकाश जाधव आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टिका केली.जनतेचे प्रश्न कसे मांडणारमहाआघाडीच्या उमेदवाराला स्वत:चे मत, निर्णय व कुठलही अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नसेल तर महायुतीच्या उमेदवाराला केवळ खुर्चीची लालसा असून सत्ते व्यक्तिरिक्त जनतेची किंमतच राहिलेली नसेल तर आपण का म्हणून त्यांना निवडून द्यावयाचे असे करबट यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर