शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील ३०० प्राचीन बावखले नष्ट होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 00:34 IST

वसईकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली बावखलांची संख्या २०० ने घटल्याने वसईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

- सुनील घरतपारोळ - वसईकरांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत असलेली बावखलांची संख्या २०० ने घटल्याने वसईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या बावखलांचे योग्य संवर्धन न झाल्याने उरलेली ३०० बावखलेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ते संवर्धन करण्याची गरज असून त्या साठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे.वसईच्या पश्चिम पट्टयÞात बावखलांची संख्या मोठयÞा प्रमाणावर आहे. शेतीसाठी, पिण्यासाठी आणि इतर कामांसाठी याच बावखलांच्या आणि नजीकच्या विहिरींचा वापर होतो. वसईत पूर्वी ५०० च्या आसपास बावखले होती. त्यांची संख्या आता ३०० पर्यंत येऊन पोहोचलीआहे. पाण्यातील क्षार संतुलित ठेवण्यासाठी बावखलेंचा उपयोग केला जातो. वसईत जेव्हा बावखलेंची संख्या ५०० च्या आसपास होती तेव्हा पाण्यातील क्षार हे १०० ते १५० च्या आसपास होते. ते आता ५०० ते ६०० पर्यंत पोचले आहेत. वसईत मोठयÞा प्रमाणावर लोकसंख्या वाढल्याने जागेच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे खाजगी बावखले नष्ट करून त्यावर भराव टाकून ही त्याजागी गृहसंकुले बांधली जात आहेत. या साठी बावखले असलेली जागा वसई विरार महापालिकेने आरक्षित करून बावखले वाचवण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.बावखले म्हणजे मोठा खड्डा त्यात पावसाचे पाणी जमा केले जाते. वसईचा भूप्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोडयÞा पाण्याच्या साठयÞासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. त्यामुळे हि बावखले वाचवणे, साफ करण्याची, संवर्धन करण्याची ही काळाची गरज आहे. बावखलेच राहिली नाही तर वसईकरांना गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.बावखले वाचले तर वसईतील पाण्याचे नैसिर्गक स्त्रोत वाचतील, या भागातील निसर्ग संपदा साठी ही पाणी उपलब्ध होईल यासाठी बावखले वाचवणे ही काळाची गरज आहे.-विजय चोघळा,अध्यक्ष पालघर जिल्हा पर्यावरण मित्र संघटना

टॅग्स :Vasai Virarवसई विरार