शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेला मुलाच्या मृत्युचे कारण फाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:16 IST

एका चार वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असताना शवविच्छेदन अहवालात डॉक्टराने मृत्युचे कारण फाशी असे नमूद केल्याने

वसई : एका चार वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असताना शवविच्छेदन अहवालात डॉक्टराने मृत्युचे कारण फाशी असे नमूद केल्याने मुलाच्या पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना नालासोपारा शहरात घडली. आयुषकुमार पटेल (४) असे मृत बालकाचे नाव आहे. नालासोपारा येथील श्री राम नगरमध्ये राहणारा आयुषकुमार शुक्रवारी संध्याकाळी झाल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली. रात्री त्याचा मृतदेह घरापासून दोन किलोमीटर दूर असलेल्या एका बांधकाम सुरु असलेल्या पाण्याच्या उघड्या टाकीत आढळून आला. शनिवारी शवविच्छेदन केल्यानंतर आयुषकुमारवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, संध्याकाळी तुळींज पोलिसांनी आयुषच्या वडिलांना बोलावून पोस्टमार्टेम अहवाल परत करण्याची मागणी केली. तसेच आयुषच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची घाई का केली म्हणून धारेवर धरून त्यांना अपमानास्पद वागणूकही दिली. रिपोर्टमध्ये काही तरी गडबड असल्याचा संशय आल्याने आयुषचे वडिल हरीकुमार पटेल यांनी एका ओळखीच्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखवला. त्यावेळी रिपोर्टमध्ये मृत्युचे कारण फाशी लागल्याचे नमूद केल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला. त्यानंतर हरीकुमार यांनी आयुषच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पुन्हा करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी ती मागणी फेटाळून लावत शवविच्छेदन अहवाल शवविच्छेदन करणारे डॉ. अविनाश डोंगरे यांच्याकडून बदलून घेतला. डॉ. डोंगरे यांनी आपली चूक मान्य करीत दिलगीरी व्यक्त केली आहे. दिवसभर आत्महत्येप्रकरणी शवविच्छेदन केले होते. त्यामुळे नजरचुकीने आयुषच्या अहवालात चुकीची नोंद झाल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. तर याप्रकरणात चौकशी सुरु आहे. आ़युषचा पाण्यात बुडूनच मृत्यु झाला आहे. डॉक्टरांकडून नजरचुकीने चुकीचे नोंद झाली आहे, अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी दिली.