शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

पालघर लोकसभा मतदार संघावर बविआ पक्षाचा हक्क - आ. ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:52 IST

बहुचर्चित पालघर लोकसभा मतदारसंघावर बविआ पक्षाचा हक्क असून येथून पहिला खासदार हा आमचा निवडून आला होता, त्यामुळे यावेळी सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जिंकूनही येणार आहोत अशा शब्दात बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर वर आपला दावा केला आहे.

वसई : येथील बहुचर्चित पालघर लोकसभा मतदारसंघावर बविआ पक्षाचा हक्क असून येथून पहिला खासदार हा आमचा निवडून आला होता, त्यामुळे यावेळी सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि जिंकूनही येणार आहोत अशा शब्दात बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर वर आपला दावा केला आहे.दोनच दिवसांपूर्वी देशात आदर्श आचारसाहिता लागू झाली आणि निवडणूकीची धामधूम सुरू झाली. त्यातच राजकीय दृष्टीने पालघर हा मुंबई जवळील मुख्य मतदारसंघ आहे. मात्र, यावर आ. ठाकूर यांनी अद्याप पर्यंत मौन बाळगले होते. परिणामी मंगळवारी प्रथमच त्यांनी याबाबत आपली चुप्पी सोडत आपण यावेळी काय करणार आहात ते सांगितले, ते पुढे म्हणाले की आतापर्यंत प्रत्येक वेळी आम्ही सर्वांना बिनशर्त पाठिंबा देत आलो आहोत. त्यामुळे यावेळी आम्हालाच सर्वांनी पाठिंबा द्यावा यासाठी मी सर्वच राजकीय पक्षांशी बोलणी सुरू केली आहे.आप्पांच्या घोषणेमुळे नेते झाले सावधपालघर मतदार संघावरून युतीमध्ये तणाव असून तो अजूनही निवळलेला नाही, तर दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नसल्यामुळे आम्ही आमचा उमेदवार ठरवून या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे अचानक आलेल्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या घोषणेमुळे युती व आघाडीच्या नते सावध झाले आहेत.

टॅग्स :Hitendra Thakurहितेंद्र ठाकूरpalgharपालघर