शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सफाळे परिसरात बोगस डॉक्टरला अटक, अनेकांचा गोरखधंदा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:49 IST

पालघर : सफाळे भागात बेकायदेशीर रित्या रुग्णावर उपचार करणा-या एका बोगस डॉक्टराला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला

पालघर : सफाळे भागात बेकायदेशीर रित्या रुग्णावर उपचार करणा-या एका बोगस डॉक्टराला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात आपली दुकाने थाटून अजूनही रु ग्णास लुटणाºया बोगस डॉक्टरांविरोधात व्यापक कारवाई होणार कधी? असा सवाल केला जात आहे.पालघर तालुक्यात १० प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यांनी आपल्या भागाच्या दिलेल्या अहवालात एकही बोगस डॉक्टर नसल्याचे कळविले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश खंदारे ह्यांनी लोकमतला दिली. मात्र आजही पालघर तालुक्यात अनेक गावागावात कुठलीही पदवी नसलेल्या बोगस डॉक्टरांची दुकानदारी कशी सुरू आहे. आज अनेक डॉक्टर परवानगी नसताना अ‍ॅलोपॅथी ओषधाचा बिनधास्त वापर करून रु ग्णांच्या जीविताशी खेळत आहेत. सफाळे येथे मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या व पाईल्स क्लिनिक चालविणाºया प्रशांतजीत किर्तनीया यांनी बीएएमएसआर अशी पदवी आपल्या नावा समोर चिकटवून दुकान थाटले होते. या डॉक्टरांकडे कुठलीही अधिकृत पदवी नसतांना त्याने वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्या बाबत सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातून माहिती मिळाल्या नंतर सफाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत ठाकूर ह्यांनी क्लिनिकवर धाड टाकून किर्तनीया यास शनिवारी अटक केली आहे.वैद्यकीय सेवा पुरविणाºया डॉक्टरांना आपली नोंद योग्य त्या कागदपत्रांसह महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलकडे केल्यानंतर त्यांना सिव्हिल सर्जन, जिल्हा वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत ह्यांच्याकडे आपल्या पदवीची कागदपत्रे नोंदविल्यानंतर त्यांना आपला व्यवसाय करण्याची परवानगी दिली जाते.पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून आजही ग्रामीण भागातील रुग्णांना हव्या तशा वैद्यकीय सेवा मिळत नाहीत.ह्याचा फायदा घेत अनेक भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे.>व्यापक मोहीम राबवाया बोगस डॉक्टरांनी एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेण्या आधीच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड ह्यांनी कडक पावले उचलण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे. सर्वच डॉक्टरांच्या व्यावसायिक दस्तऐवजांची तपासणीची मोहीम राबविल्यास अनेकांचा भंडाफोड होणार आहे.

टॅग्स :doctorडॉक्टर