शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरकरांना प्रतीक्षा नव्या उड्डाणपुलांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 23:38 IST

कोंडीचा प्रश्न जटिल : मंजुरी मिळूनही कार्यवाही नाही

बदलापूर :  पर्यायी उड्डाणपुलाअभावी बदलापूरमध्ये दिवसेंदिवस वाहतूककोंडीची समस्या वाढत चालली आहे. बदलापूर पूर्व- पश्चिम भागाला जोडणाऱ्या बेलवली ते कात्रप या उड्डाणपुलाला एमएमआरडीएकडून मंजुरी मिळाली असल्याचे तसेच बॅरेज रोड-होप इंडिया उड्डाणपुलालाही हिरवा कंदील मिळाला असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापही या उड्डाणपुलांच्या उभारणीच्या हालचाली दिसत नसल्याने बदलापूरकरांना नव्या उड्डाणपुलांच्या प्रतीक्षेत वाहनकोंडीचा सामना करावा लागत आहे.

सध्या बदलापूरमध्ये पूर्व-पश्चिम भागात ये- जा करण्यासाठी वाहनांना नगरपालिका कार्यालयाजवळून जाणारा उड्डाणपूल हा एकमेव सोयीस्कर मार्ग आहे. पूर्वी शहराच्या पूर्व-पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना बदलापूर रेल्वेस्टेशन फाटक, बेलवली रेल्वे फाटक व सध्याच्या उड्डाणपुलाजवळ असलेला सबवे असे तीन पर्याय होते. उड्डाणपुलाची उभारणी झाल्यानंतर दोन्ही रेल्वे फाटके बंद करण्यात आली. सबवेही अरुंद झाल्याने फक्त दुचाकी जाऊ शकतील एवढाच रस्ता तिथे आहे. त्याचबरोबर बेलवलीतील सब-वे मध्ये बारमाही पाणी साचत असल्याने तो फारसा उपयोगाचा नाही. त्यामुळे बदलापूर पूर्व- पश्चिम भागात ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीची संपूर्ण भिस्त या एकमेव उड्डाणपुलावर आहे. या उड्डाणपुलावर एखादे वाहन बंद पडल्यास काही मिनिटांंत मोठ्या प्रमाणात कोंडी होते.  त्यामुळे बेलवली ते कात्रप तसेच बॅरेज रोड-होप इंडिया या भागात पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाची उभारणी होण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.

नेत्यांनी सांगितलेले खरे की खोटे?nगेल्यावर्षीच्या मे महिन्यात एमएमआरडीए बेलवली-कात्रप या उड्डाणपुलाचे काम करणार असल्याबाबत निर्णय झाला असून लवकरच पुढील कार्यवाही करून या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. हा पूल चारपदरी असेल, असेही सांगण्यात आले होते. त्यानंतर, बॅरेज रोड-होप इंडिया या रेल्वे उड्डाणपुलाचीही उभारणी करण्यासाठी एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्या असल्याचे राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या उड्डाणपुलांच्या उभारणीसंदर्भात कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने नव्या उड्डाणपुलांची उभारणी होणार तरी केव्हा, असा सवाल बदलापुरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

टॅग्स :badlapurबदलापूर