शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-अहमदाबाद हायवेवर अवतरले यमदूत

By admin | Updated: January 21, 2016 02:27 IST

हाय वेवर विनाहेल्मेट बाइक चालवणाऱ्यांना चक्क यमदूत हेल्मेटची भेट असल्याचे अनोखे चित्र सध्या मुंबई-अहमदाबाद हाय वेवर बघायला मिळत आहेत

वसई : हाय वेवर विनाहेल्मेट बाइक चालवणाऱ्यांना चक्क यमदूत हेल्मेटची भेट असल्याचे अनोखे चित्र सध्या मुंबई-अहमदाबाद हाय वेवर बघायला मिळत आहेत. तसेच काही मुले पथनाट्याव्दारे तर पोलीस स्टिकर आणि इतर साहित्य वाटून वाहनचालकांना रस्ता सुरक्षेचे नियम पटवून देताना दिसतात.चिंचोटी महामार्ग पोलिसांनी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने चिंचोटी येथे वाहनचालकांचे प्रबोधन आणि बाइकस्वारांना विनाहेल्मेटने गाडी चालवण्याबद्दल जनजागृती मोहीम हाती घेतली. विनाहेल्मेट बाइकस्वारांना यमदूत अडवून त्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगतो. त्यानंतर, बाइकस्वाराला मोफत हेल्मेट दिले जाते. १० जानेवारीपासून सुरू झालेल्या अभियानाद्वारे ५०० बाइकर्सना हेल्मेटचे वाटप करून सुरक्षेचे धडे दिले. पोलिसांनाही रिफ्लेक्टर जॅकेट देण्यात आले.महामार्ग पोलीस मदत केंद्र चिंचोटी येथे झालेल्या या कार्यक्रमाला वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, पोलीस निरीक्षक सी.जी. सावंत महामार्ग पोलीस अधीक्षक समाधान पवार, चिंचोटीचे प्रभारी अधिकारी आनंद भोईर, उपनिरीक्षक ए.डी. यादव आणि वोक्हार्टचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी आदी मान्यवर उपस्थित होते. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांचे प्राण कसे वाचवता येतील, यावर वोक्हार्टच्या अतिदक्षता विभागाचे डॉ. शरद यादव यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.जोपर्यंत दुचाकीस्वाराला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हेल्मेटचे महत्त्व समजणार नाही, तोपर्यंत अपघातात दुचाकीस्वारांचे नाहक बळी जाण्याचे प्रमाण कमी होणार नाही. भारतातील वाहन उद्योगाचा विस्तार लक्षात घेता आता वाहन अथवा रस्ता सुरक्षिततेचे प्रशिक्षण शाळा व महाविद्यालयांतूनच दिले गेले पाहिजे, असे मत हितेंद्र ठाकूर यांनी या वेळी मांडले. (प्रतिनिधी)