शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उमरोळी स्थानकाबाहेर दुचाकी जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:24 IST

गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

पालघर : उमरोळी रेल्वे स्थानकाशेजारी पार्किंग केलेली दुचाकी उचलून नेत ती दुसऱ्या ठिकाणी नेऊन जाळण्याचा प्रकार घडल्याने उमरोळी गावातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या चोरीच्या घटनांबरोबरच गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली असून पालघर पोलिसांपुढे आव्हान उभे ठाकले आहे.पडघे येथील रहिवासी अनिकेत पाटील शुक्रवारी आपली दुचाकी उमरोळी रेल्वे स्थानकाशेजारी उभी करून ते लोकलने विरारला आपल्या बहिणीच्या घरी गेले. रात्रीची गाडी पकडून ते आपल्या पत्नीसह पालघर स्थानकात ११ वाजता उतरून टेंभोडे येथील घरी झोपायला गेले. पहाटे ५.३३ ची लोकल पकडून त्यांनी उमरोळी स्टेशन गाठले आणि उभी केलेली दुचाकी शोधत होते. ती जागी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता काही अंतरावर त्यांची दुचाकी जळत असल्याचे पाहिले.पाटील हे बांधकाम व्यवसायात असून एका निवासी संकुलाच्या व्यवहारावरून एका व्यक्तीने त्यांच्या दुचाकीची चावी जबरदस्तीने काढून घेऊन गेल्याची घटना घडल्याची माहिती पुढे येत आहे. बनावट चावीने ती दुचाकी चोरून काही अंतरावर ती जाळण्यात आली. या प्रकरणी पालघर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.