शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात स्मशानभूमी तोडण्याचा प्रयत्न, मनसे कार्यकर्त्यांनी हाणून पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:47 IST

नालासोपारा पूर्वेकडील तुळिंज डोंगराखाली वनविभागाच्या जागेवर कित्येक वर्षांपासून स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या बाजूला दफनभूमीही आहे.

नालासोपारा : मृतदेह जळत असतानाही स्मशानभूमी तोडण्याचा वनविभागाचा प्रयत्न नालासोपाºयातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.नालासोपारा पूर्वेकडील तुळिंज डोंगराखाली वनविभागाच्या जागेवर कित्येक वर्षांपासून स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या बाजूला दफनभूमीही आहे. या परिसरात महापालिकेची स्मशानभूमी नसल्याने या स्मशान आणि दफनभूमीवर येथील हजारो नागरिक अवलंबून आहेत. वनखात्याच्या जमिनीवर लोकांनी उभारलेल्या या स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पाणी नाही, डोक्यावर छप्पर नाही, आजूबाजूला घाणीचे साम्राज्य, लाकडे उपलब्ध, मोकाट गुरांचा वावर अशा परिस्थितीतही नाईलाजाने मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.जागा वनविभागाची असल्याने महापालिकेला स्मशानभूमी दुरुस्त करता येत नव्हती. मात्र, लोकांची सततची मागणी आणि स्मशानाची दुरवस्था पाहून महापालिकेने ही स्मशानभूमी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले होते. बांधकामाचे पिलर आणि फाउंडेशन बांधून तयार होताच वनविभागाने कारवाईचे शस्त्र उगारले आणि प्रचंड फौजफाटा आणून बांधकाम तोडण्यास सुरुवात केली. एका बाजूला मृतदेह जळतो आहे, दुसºया बाजूला आणखी एक मृतदेह अंतिम संस्कारासाठी ताटकळत होता, तरीही वनविभागाकडून स्मशानभूमी तोडण्याचे काम सुरू होते. ही माहिती मिळाल्यावर मनसेचे शहराध्यक्ष राज नागरे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली. कारवाई करणाºया वनविभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मनसे स्टाईलने झापले आणि जेसीबीसह हाकलून लावले. त्यामुळे ही स्मशानभूमी तूर्तास वाचली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार