शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

तोडकाम पथकावर पुन्हा हल्ला

By admin | Updated: June 23, 2016 02:47 IST

गोखीवरे येथील अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या वसई विरार महापालिकेच्या पथकावर जमावाने हल्ला चढवून सहा कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

वसई : गोखीवरे येथील अनधिकृत बांधकाम तोडणाऱ्या वसई विरार महापालिकेच्या पथकावर जमावाने हल्ला चढवून सहा कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हल्ल्यानंतर पालिकेने कारवाई गुंडाळून वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. तर अनधिकृत बांधकामांविरुद्धची कारवाई जारी ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.दर बुधवारी पालिकेकडून एका विभागात अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहिम हाती घेण्यात येते. यावेळी गोखीवरे परिसरात ही मोहिम सुरु होती. येथील गावठाणात स्थानिकांनी काही बिल्डर्स हाताशी धरून मोठ्या इमारती बांधल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार पालिकेचे उपायुक्त किशोर गवस यांच नेतृत्वाखाली सर्व सहाय्यक आयुक्त आणि कर्मचारी कारवाई करीत होते. चार मजली दोन आणि पाच मजली एका इमारतीवर कारवाई झाल्यानंतर मोठा जमाव आडवा आला.या जमावाने थेट पालिकेच्या पथकावरच हल्ला चढवला. पोलीस बंदोबस्त असतानाही लोकांनी पोकलेनच्या ड्रायव्हरसह सहा कर्मचाऱ्यांना मारहाण केली. कारवाई मागे घेतल्यानंतरच जमाव शांत झाला. पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले. तसेच वालीव पोलीस ठाण्यात काही लोकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. याठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करू अशी हमी बिल्डरांकडून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांनी संबंधित बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहाय्क आयुक्तांना यावेळी दिले. आजच्या कारवाईत तुंगारेश्वर येथील तीन व सातीवली येथील चार इमारतींवर कारवाई करणत आली. मात्र, गोखीवरे येथील हल्ल्यानंतर कारवाई अर्धवट सोडून देण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)