मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत हलोली-बोट गावाजवळी गुरु पंजाब ढाब्यावर पोलिसांनी छापा टाकून २०० लिटर काळ््या आॅईलसह तिघांना अटक केली व टेम्पोही जप्त करण्यात आला. येथे काळ््या आॅईलची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनावणे यांनी छापा टाकला. टेम्पोची तपासणी केली असता प्लास्टिकच्या सहा बॅलरमध्ये ३ लाख ६० हजार रु पये किमतीचे२०० लिटर काळे आॅईल सापडले. मुरलीधर हरिबा चव्हाण वय ५२ रा.भिवंडी, ठाणे, मोहन विजय सरोज वय ५० रा. गुरु पंजाब ढाबा हलोली बोट, गुरूपाल सिंग रा. बोईसर ( ढाबा मालक ) यांना अटक करण्यात आली. (वार्ताहर)
काळ््या आॅईलसह हलोलीजवळ ३ अटकेत
By admin | Updated: July 26, 2016 03:05 IST