शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:23 IST

गुंगीचे औषध दिले; नालासोपाऱ्यातील घटना

नालासोपारा : विरारला राहणाºया ३८ वर्षीय महिलेला परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेऊन तिला शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दिल्यावर पोलिसांनी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यापैकी पाच आरोपींना मुंबईच्या कुर्ला येथून अटक केली आहे. दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.विरारला राहणाºया ३८ वर्षीय पीडित महिलेची आॅक्टोबर २०१९ ते मे २०२० यादरम्यान नालासोपारा पश्चिमेकडील एका इमारतीमध्ये आरोपी रुक्साना सलीम सिद्दिकी (६०) यांच्यासोबत ओळख झाली होती. त्यांनी त्यांचे पती आरोपी सलीम सिद्दिकी (६५) हे परदेशात नोकरीस पाठवतात, असे आमिष दाखवून पीडित महिलेकडून २ लाख रुपये घेतले. नंतर तिला शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून दिल्याने ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तीन आरोपींनी तिचे नग्न अवस्थेत फोटो काढून ती शुद्धीवर आल्यावर तिच्या घरी पाठवून दिले. तिन्ही आरोपींनी त्यांच्या घरात एकटे असताना पीडित महिलेला बोलावून तिचे अश्लिल फोटो वायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले.१० दिवसांत परदेशात नोकरीची व्यवस्था होईल असे सांगून दुसºया दोन आरोपींसोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे पीडितेस सांगण्यात आले. पण पीडित महिलेने यास नकार दिला. तरी तिच्यावर अत्याचार होत राहिले. शेवटी कंटाळून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी आरोपी सलीम सिद्दिकी (६५), अखिल सलीम सिद्दिकी (३२), फिरोज सलीम सिद्दिकी (२५), विजय बलराम फतीयाल (३०), वेनम (२५), रु क्साना सलीम सिद्दिकी (६०) आणि फरिन सलीम सिद्दिकी (२५) या सात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.घटनेची तक्र ार आल्यावर सात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एलसीबी, नालासोपारा आणि तुळिंज या पोलिसांच्या तीन टीम बनवून एकाच परिवारातील दोन महिला आणि तीन पुरुष अशा पाच आरोपींना बुधवारी मुंबईच्या कुर्ला येथून अटक केली आहे.- वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारापोलीस ठाणे