शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

ट्रस्टच्या विदेशी संचालिकेला मारहाण, खंडणीची धमकी

By admin | Updated: January 22, 2017 02:53 IST

या तालुक्यातील निबंवली येथे श्री नित्यानंद एज्युकेशन ट्रस्ट असून त्यात नोकरीस असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी संस्थेविरोधात वर्तन केल्याने त्यांना कामावरून का कमी करू नये याबाबतची

वाडा : या तालुक्यातील निबंवली येथे श्री नित्यानंद एज्युकेशन ट्रस्ट असून त्यात नोकरीस असलेल्या तीन कर्मचाऱ्यांनी संस्थेविरोधात वर्तन केल्याने त्यांना कामावरून का कमी करू नये याबाबतची विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी संस्थेवर मोर्चा काढून मारझोड करण्याची धमकी देऊन भरपाई म्हणून पैशाची मागणी केली असल्याची तक्रार संस्थेच्या सचिवांनी वाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या संस्थेत ६० ते ७० महिला कामाला आहेत. आदिवासी महिलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जात आहे. या संस्थेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविल्या जातात. यामध्ये बॅगा, पायपुसण्या, उशी कव्हर, मोबाईल पाऊच, शो पीस, तयार केल्या जातात. येथील महिला हे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. या संस्थेला एक परदेशी महिला आर्थिक मदत करत असते. या संस्थेत संदीप ठाकरे, हर्षला जाधव व भावना घाटाळ हे तीन कर्मचारी नोकरी करतात. या तिघांनी एक आवाज या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील झडिके येथे ३ जानेवारी रोजी सावित्री बाई फुले साजरी केली होती. मात्र याच दिवशी या संस्थेने आयोजिलेल्या सावित्रीबाई फुले जयंतीच्या सोहळ््यात ते सहभागी झाले नाही. तसेच त्याच्या आयोजनात त्यांनी सहकार्यदेखील केले नाही. उलट रजा घेऊन ते अन्य संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यामुळे तुमच्यावर कारवाई का करू नये अशी विचारणा केली असता संदीप ठाकरे या कर्मचाऱ्यांने संस्थेच्या संचालिका जेनेटा मोनोसा यांना दूरध्वनी करून संस्थेवर मोर्चा काढून तुम्हाला मारझोड करू असे धमकावले व भरपाई म्हणून पंधरा लाखांची मागणी केली. अशी तक्रार संस्थेच्या सचिव गंगाताई गरेल यांनी पोलिसात दाखल केली आहे. याबाबत या तिघा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वाडा पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)