शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडविल्या

By admin | Updated: July 2, 2017 05:40 IST

आश्रमशाळा शिक्षक, अधिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भातील आदेश अप्पर आयुक्त, ठाणे यांनी देऊनही त्याची

लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : आश्रमशाळा शिक्षक, अधिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भातील आदेश अप्पर आयुक्त, ठाणे यांनी देऊनही त्याची अंमलबजावणी जव्हार प्रकल्प अधिकाऱ्यांनी न केल्याने तब्बल ७५ कर्मचाऱ्यांची कुचंबणा सुरु आहे. त्याबाबत आदिवासी प्रकल्प शिक्षक कर्मचारी संघटनेने विचारणा करुनही कोणतेही उत्तर दिले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्र मगड व वाडा या चार तालुक्यातील ३० आश्रमशाळांचा समावेश आहे. याबाबत संघटनेने २९ जून रोजी विविध मागण्याचे निवेदन जव्हार प्रकल्प कार्यालयाला दिले होते. बदलेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण व प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु असतांना शिक्षकांच्या बदल्या वेळेत न झाल्यास शालेय नियोजन कोलमडून त्याचा दूरगामी परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होणार असल्याचे सुभाष भांगरे यांनी सांगितले. त्याचबरोबर बदलीच्या नंतर शिक्षकांना रहायची व्यवस्था करणे त्यांच्या मुलांचा शैक्षणिक प्रवेश या बाबी वेळेवर करताना शिक्षकांना अडचणी निर्माण होणार आहेत. यामुळे तात्काळ मार्ग न निघाल्यास शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. याबाबत अनेकदा जव्हार प्रकल्प अधिकारी पवनीत कौर यांच्याशी प्रत्यक्ष दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.भरती करून शिक्षकांवरील अतिरिक्त भार काढाआदिवासी आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघटनेने केलेल्या मागण्यांत आश्रमशाळांची वेळ ११ ते ५ करा, प्राथमिक मुख्याधापकपद पुर्नजिवीत करण्यात यावे, नियातकालिन बदल्याबाबत कार्यवाही व्हावी, शिक्षकांवरील अतिरिक्त भार काढण्यासाठी रिक्त पदे भरावीत, कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वेतन निश्चित करावे, उच्च माध्यमिक शिक्षकांची जुलै २०१६ पासून रोखलेली वेतनवाढ त्वरीत देण्यात यावी याचा समावेश आहे.आंदोलनाचा इशारावरिष्ठ कार्यालय एसीटी ठाणे येथून आलेल्या शिक्षक बदली आदेशांची अंमलबजावणी करून कर्मचाऱ्यांना दिलासा देणे ही प्रकल्प कार्यालयाची नैतिक जबाबदारी होती, परंतु १ महिना झाल्यानंतरही त्याबाबत कोणतीच हालचाल होत नसल्याने आदिवासी प्रकल्प शिक्षक कर्मचारी संघटना आंदोलन करणार असल्याचे अध्यक्ष सुरेश भांगरे यांनी लोकमतला दिली.