शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कला, खेळ आणि शिक्षण महत्वाचे

By admin | Updated: February 22, 2017 05:48 IST

कोणतीही कला, खेळ आणि कोणत्याही भाषेत घेतलेले शिक्षण याला जीवनात अनन्य साधारण महत्व आहे

वसई : कोणतीही कला, खेळ आणि कोणत्याही भाषेत घेतलेले शिक्षण याला जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. जीवन सफल होण्यासाठी या तीनही बाबी मोलाच्या ठरतात. जीवनात जगण्याचा आनंद द्विगुणीत करतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाटककार, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी वसईत केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कवी नंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. यावेळी ते म्हणाले की, प्रबळ इच्छाशक्ती होती म्हणून कोकणातून मुंबईत शिक्षण घ्यायला आलो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुंबईत राहिलो, नोकरी केली आणि १९६२-६३ दरम्यान जे डोक्यात होते ते नाटक पुन्हा नव्याने डोक्यात घोळू लागले. गावाकडे नाटक बसवताना अनंत अडचर्णी येतात. जड अंतकरणाने गावात बोर्ड लिहावा लागतो, आज नाटक व्हवूचा नाय. त्याच अनुभवातून वस्त्रहरण या नाटकाचा जन्म झाला. त्या नाटकाने मला, मराठी रंगभूमीला मोठा लौकीक मिळवून दिला. एका मालवणी नाटकाने साता समुद्रापलिकडे झेप घेतली. लेखक या नात्याने मला अनेक पुरस्कार मिळवून दिले. हा सगळा प्रवास त्यांच्या आयुष्याचा असला तरी त्यांनी तो एका तासात अतिशय मनमोकळेपणाने व त्यांच्या विनोदी शैलीत असा काही मांडला की उपस्थित एक तास खळखळून हसत, उत्स्फूर्त दाद देत, असत असेही गवाणकर यांनी यावेळी बोलताना सांगिलते. (प्रतिनिधी)