शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सोने घोटाळ्याच्या सूत्रधाराला अटक करा, अन्यथा आत्मदहन

By admin | Updated: February 3, 2017 02:14 IST

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेमध्ये फेब्रुवारी २०१६ या महिन्यात उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणाचा सूत्रधार हेमंत उदावंत व त्याच्या

- रविंद्र साळवे, मोखाडाठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेमध्ये फेब्रुवारी २०१६ या महिन्यात उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणाचा सूत्रधार हेमंत उदावंत व त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करावी व गोवल्या गेलेल्या सर्व आरोपींची मुक्तता करावी अन्यथा सहकुटुंब आत्मदहन करू असा इशारा याप्रकरणी तुरुंगात असलेल्या वसिम याच्या वडिलांनी पोलिसांना दिला आहे. मोखाडा शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून उदयास आलेला हेमंत उदावंत हा अवघ्या काही वर्षातच करोडपती झाला होता. मात्र अवघ्या काही दिवसातच त्याच्या अमाप श्रीमंतीचे बिंग फुटले व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेतील त्याचे बनावट सोने तारण कर्जाचे प्रकरण उघडकीस आले. या कर्जामध्ये हेमंत उदावंत याने आपली पत्नी, बँक शाखा व्यवस्थापक मोरे, शाखा हिशेबनीस गावित व बँकेचा सोनेमूल्यमापक चंद्रकांत बागूल, वॉचमन, उदावंत याच्या वाहनाचा चालक वसिम मनियार व अन्य कामगार अशा एकूण १७ लोकांच्या नावे मोखाडा शाखेत ५ किलो ३३७ ग्रॅम म्हणजे जवळपास २ कोटी ७३ लाखांचे बनावट सोने तारण ठेऊन कर्जाची उचल केली. तपासणीत हे सोने बनावट निघाले. त्यामुळे १७ कर्जदारांवर गुन्हे दाखल झाले. यामुळे गेल्या ३ ते ४ महिन्यापासून कारागृहात असलेला वसिम मनियार त्याची पत्नी, दोन मुले व वडिल यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्य आरोपीस व त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक करावी व नाहक या प्रकरणात गोवलेल्या सर्व आरोपीना सोडावे. अशी त्यांची मागणी आहे.- या घोटाळ्याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे इतरावर कारवाई करु नये असे २६ फेब्रुवारी २०१६ रोजी बँक शाखा व्यवस्थापकांच्या समोर २०० रु पयांच्या स्टँम्प पेपरवर हेमंत उदावंत याने लिहून दिले. तरीही या प्रकरणात गोवण्यात आलेल्या १६ पैकी १४ आरोपीना नाहक कारागृहाची हवा खावी लागते आहे.