शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वेवूर येथील बलात्का-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 02:59 IST

पालघर : पूर्वेकडील वेवुर येथे राहणा-या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी वसीम अमीर शेख (२३) यास पालघर पोलिसांनी पोक्साखाली अटक केली आहे.

पालघर : पूर्वेकडील वेवुर येथे राहणा-या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी वसीम अमीर शेख (२३) यास पालघर पोलिसांनी पोक्साखाली अटक केली आहे. हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे का? याचा पालघर पोलीस तपास करीत आहेत.वेवुर येथे राहणाºया अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी राहणाºया आरोपीने १६ आॅगस्ट रोजी या मुलीला फिरण्याच्या बहाण्याने मुंबईला नेले. दादरवरून उत्तर प्रदेशात जाणारी गाडी पकडून ते दोघे मिर्झापूर येथील मित्राच्या घरी उतरले व तेथे त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. २३ सप्टेंबरला ते मिर्झापूरवरून ते दोघेही चंदीगडला आले. तेथे भाड्याने खोली घेऊन तो एका प्रेसमध्ये नोकरी करू लागला. आपण कोठे राहतो ह्या बाबत कुणालाही काही माहिती दिल्यास चांगले होणार नाही असा दम त्याने तिला दिला. तेथून ११ आॅक्टोबरला त्या दोघांनी थेट डहाणू गाठले आणि त्या शेखचा छोटा भावोजी समीम शेख यांनी दोघांचा निकाह लावून दिला. तेथे त्यांनी २२ दिवस वास्तव्य केल्यानंतर त्यांनी सुरत गाठले. आणि काही दिवसातच त्या मुलीला मारहाण होऊ लागली. त्यामुळे वसीम शेखचा खरा चेहरा तिच्या समोर आला. मारहाणीच्या प्रकारात वाढ होऊ लागल्यानंतर सुरतला ज्या भाड्याच्या खोलीत ते राहत होते. त्या मालकीणीला विनंती करून त्याच्या मोबाईलवरून तिने आपल्या आईशी संपर्क साधला. त्यांनी पालघर पोलिसांच्या मदतीने सरळ सुरत गाठले आणि दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी वसीम विरोधात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.>हा प्रकार लव्ह जिहादचा?हा प्रकार लव्ह जिहादच्या प्रकरणातून घडला आहे का ह्याचाही पोलीस तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी दिली. याचा तपास पो.उपनिरीक्षक शरद पवार हे करीत आहेत.