शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

सेना,भाजपाचे रथी-महारथी मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:50 IST

मतदार संभ्रमात : पालघर लोकसभा क्षेत्रातील गावागावांमध्ये पदयात्रा

पालघर : पालघर विधानसभेच्या मागील पोटनिवडणुकीत आपल्या खास शैलीद्वारे एकहाती विजय मिळवून देणारे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक हे सध्या पालघर विधानसभा क्षेत्रात गाव पाड्यात पायी फिरून आपली व्यूहरचना आखीत असल्याने विरोधकांच्या गोटात चिंता वाढली आहे. दुसरीकडे भाजपनेही सेनेच्या टीमला रोखण्याची रणनीती आखली आहे.सेनेने श्रीनिवास वनगा यांना खासदारकीचा उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे डिवचलेल्या भाजपने काँग्रेसमधून राजेंद्र गावित यांना आपल्या पक्षात सामावून त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली. या नाट्यमय घडामोडीनंतर भाजप व सेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून भाजपकडून स्वत: मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री तीन जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार यांचा फौजफाटा तर शिवसेनेकडून स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री, ठाणे पालकमंत्री, खासदार आमदार यांचीही फळी जिल्ह्यात प्रचारासाठी तैनात केली आहे. सेनेच्या प्रचार फळीने उमरोली स्थानकांवर नसलेल्या अनारक्षित तिकीट प्रणालीचा मुद्दा असो किंवा स्थानकावर गाडयांना थांबा न देण्याच्या रेल्वेच्या धोरणाबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा व पाठपुरावा करण्याची आश्वासने दिले आहे.सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आ.रवींद्र फाटक यांनी सध्या पालघर विधानसभा क्षेत्रातील केळवा, एडवण, उसरणी, कोरे, माहीम, शिरगाव, सातपाटी, बोईसर, कुंभवली, कोळवाडे, मुरबे, आलेवाडी, नवापूर, प्ररनाली, सालवाड, पाम-टेम्बी आदी किनारपट्टीवरील गावांना भेटी देत त्यांच्या समस्यांवर उपाययोजना आखात आहेत.आंदोलनाला पाठिंबासेनेकडून आलेवाडी-नांदगाव च्या समुद्र किनाऱ्याच्या प्रस्तावित असलेला जिंदाल जेट्टी प्रकल्पाला स्थानिकांचा पूर्ण विरोध असल्याने तो मुद्दा हाताशी धरुन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एकुणच शिवसेनेचे नेतेमंडळी मतदारांना भेटून त्यांच्याशी शिवसेना स्टाईलने संपर्क साधत आहेत.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018