शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

युनियन बँकेत मनमानी

By admin | Updated: January 9, 2017 05:56 IST

युनियन बॅकेत कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून खाते उघडून देण्याबाबत ते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप

वाडा : युनियन बॅकेत कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून खाते उघडून देण्याबाबत ते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप किसानसभेचे अध्यक्ष सुनिल पाटील यांनी केला. या बाबत तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, खाते उघडण्यासाठी जाणा-या महिला बचत गट, जेष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांना कर्मचारी खाते उघडण्यासाठी फॉर्म देत नाहीत. तुम्ही सायबर कॅफेमध्ये जा तिथे तुम्हाला आॅन लाईन फॉर्म भरून मिळेल. असे सांगितले जाते. सायबर मध्ये एक फॉर्म भरून देण्यासाठी १०० रूपये रोख मोजावे लागतात. गरिब आदिवासींना ही रक्कम भरणे शक्य नसल्याने ते हिरमुसले होऊन खाते न उघडताच जातात. काही पदरमोड करून सायबर कॅफेतून फॉर्म भरतात. या बाबीची गंभीर दखल घेऊन सबंधीतावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी संघटनेच्या वतीने केली आहे. (वार्ताहर)