शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

 भाईंदर शहरात आणखी एका रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी  

By धीरज परब | Updated: June 14, 2023 20:04 IST

मेट्रो कारशेडसाठी डोंगरी येथील सरकारी जमीन संपादित करण्याच्या कामास लवकरच सुरवात केली जाणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मीरारोड  -  भाईंदर येथील पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या जुन्या रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधण्याच्या मागणीस एमएमआरडीए आयुक्तांनी मंजुरी दिल्याचे तसेच मेट्रो कारशेडसाठी डोंगरी येथील सरकारी जमीन संपादित करण्याच्या कामास लवकरच सुरवात केली जाणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. बुधवारी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या दालनात मीरा भाईंदर मेट्रो कामांसाह  कारशेड, फुट ओवर ब्रिज आदि विविध विकास कामां बद्दल बैठक झाली. यावेळी आ. सरनाईक सह आमदार गीता जैन, एमएमआरडिएचे अघिकारी, शहर अभियंता दीपक खांबित, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, सचिन मांजरेकर आदी उपस्थित होते. 

भाईंदर पूर्व - पश्चिम रेल्वे फाटक बंद झाल्याने त्याठिकाणी उड्डाण पूल बांधण्याची मागणी आ. सरनाईक यांनी केली होती. बैठकीत आयुक्तांनी कामाला मान्यता देत लवकरच  या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या कामासाठी जवळपास १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे भाईंदरला आणखी एक पूर्व - पश्चिम जोडणारा उड्डाणपूल झाल्यास सध्याच्या उड्डाणपुलावर होणारी कोंडी कमी होऊन नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे. 

मीरा भाईंदर मेट्रोचे काम सुरु असताना होणाऱ्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांना, वाहन चालकांना त्रास होणार नाही, अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी, सुरक्षेच्या दृष्टीने  उपाययोजना करून बॅरीगेट्स लावावेत, महामार्गा लगतचा खराब झालेला सर्व्हिस रस्ता दुरुस्त करावा असे सांगण्यात आले. मेट्रो उत्तन पर्यंत नेण्यासह डोंगरी येथील कारशेडच्या जागेचे भूसंपादन लवकरच सुरु करण्या बाबत चर्चा झाली . या कामांच्या निविदा काढून कामांना सुरवात करण्याची मागणी आमदारांनी केली. गायमुख ते काशीमीरा मेट्रो मार्गाची निविदा काढून कामास सुरवात करण्याची मागणी केली असता या मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा लवकरच निघेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले असे आ. सरनाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :mira roadमीरा रोडpratap sarnaikप्रताप सरनाईक