शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील विकासकामांना मंजुरी

By admin | Updated: August 28, 2015 00:09 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १३८ वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत २८ निरनिराळ्या विषयांवर

वसई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १३८ वी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच पार पडली. या बैठकीत २८ निरनिराळ्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या वेळी वसई-विरारच्या महापौर प्रवीणा ठाकूर यांनी ग्रामीण भागातील विकासकामांची यादी मुख्यमंत्र्यांना सादर केली. मुख्यमंत्र्यांनी ही विकासकामे मंजूर करीत पुढील कार्यवाहीचे आदेश दिले.महापौर प्रवीणा ठाकूर यांनी नायगाव-भार्इंदर खाडीवरील सहापदरी पूल, अर्नाळा सुभाष लेन ते मुक्कामपाडा, अर्नाळा ते शीतलवाडी, रानवाडी ते लक्ष्मण रस्ता, अर्नाळा ते बेंडेवाडी, अर्नाळा पारनाका, जांभूळपाडा व ज्योती रस्ता अशा प्रलंबित विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अधिक माहिती घेऊन ही कामे लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले. या विकासकामांसाठी २ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या वेळी प्रवीणा ठाकूर यांनी मोनोरेल, अलिबाग मल्टीकॉरिडोअर, दहिसर-मीरा रोड-माणिकपूर-विरार मेट्रो रेल्वे, पश्चिम सागरी जोडरस्ता (सी-लिंक) या महत्त्वाच्या विकासकामांकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच महापालिकेचा रिंगरूट प्रकल्पही प्राधिकरणामार्फत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या वेळी त्यांच्यासमवेत माजी महापौर नारायण मानकर व प्रकाश वनमाळी आदी पदाधिकारी होते. या बैठकीत महापौर ठाकूर यांनी महापौर सहायता निधीत जमा झालेला ५ लाख ५ हजार ३३० रु.चा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधीसाठी सुपूर्द केला. (प्रतिनिधी)