शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पालघरात असंघटीत कामगारांना पेन्शन लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:20 IST

जिल्ह्यातील सर्व असंघटीत कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून वयाच्या साठाव्या वर्षानंतर कमीतकमी तीन हजार रुपये पेन्शन मिळणार

पालघर : जिल्ह्यातील सर्व असंघटीत कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून वयाच्या साठाव्या वर्षानंतर कमीतकमी तीन हजार रुपये पेन्शन मिळणार असून यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होणार आहे. अनेक योजनांपासून वंचित असणाऱ्या या असंघटीतांना न्याय मिळवून देण्याचा संघटीतपणे प्रयत्न करू असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी केले.जिल्ह्यात तारापूर एमआयडीसी, पालघरमधील बिडको आदी वसाहती, वाडा, विक्रमगड, डहाणू, वसई, तलासरी आदी भागातील कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात असंघटीत कामगार आहेत. जिल्ह्याला २५ हजार असंघटीत कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यातील ५ हजार ५०० कामगारांची नोंदणी करण्यात आली असली तरी आम्ही आपले उद्दिष्ट वेळीच पूर्ण करू असा आशावाद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी प्रस्ताविकेतून व्यक्त केला. एमआयडीसी कारखान्यातून कामगारांची नोंदणी करण्याबाबत तारापूरच्या कामगार उपायुक्तांकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटीत कामगारांच्या आयुष्यात दूरगामी परिणाम करणारी योजना असल्याचे सांगून कामगारांच्या पगारातील थोड्या रक्कमेत राज्यशासनाचाही वाटा समविष्ट करून तिचा फायदा त्यांना मिळून त्यांचा वृद्धापकाळ सुखावह होईल असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी व्यक्त केले.रिक्षा चालक, फेरीवाले, मिड-डे मील कामगार, माथाडी कामगार, शेती मजूर, घर कामगार इत्यादीना अनेक आर्थिक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. या १८ ते ४० वयोगटातील १५ हजारापेक्षा कमी मासिक वेतन असणाऱ्या असंघटीत कामगारांना योग्यवेळी पेन्शन मिळाल्याने त्यांना मोठा आधार मिळणार आहे असे बोरीकर यांनी यावेळी सांगतिले. यावेळी प्रासंगिक स्वरुपात जिल्ह्यातील निवडक लाभार्थींना त्यांचे नोंदणी पत्र देण्यात आले.