शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

चिकू फळांवर रोगांच्या प्रादुर्भावाने चिंता; शेतीशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 01:00 IST

डहाणूमध्ये शेतकऱ्यांसाठी वर्षभर व्यवस्थापन वर्ग घेणार

बोर्डी : डहाणू तालुक्यात चिकू हे प्रमुख फळबागायती पीक आहे. मात्र दिवसेंदिवस फळांना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. याकरिता तालुका कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड यांनी ‘चिकू कीड रोग व्यवस्थापन’ याविषयी कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील घोलवड-डहाणूला चिकू भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या पिकाची जिल्ह्यातील एकूण लागवड १० हजार हेक्टर असून डहाणू तालुक्यातील क्षेत्र ६ हजार हेक्टर आहे. येथील युवा सुशिक्षित या क्षेत्राकडे वळला आहे. परंतु मागील काही वर्षांत या फळावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनावर परिणाम होऊन बागायतदार हवालदिल झाला आहे. या रोगावर उपाययोजनेकरिता तालुका कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांच्यातर्फे चिकू कीड रोग व्यवस्थापन हा संयुक्त कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार सरावली, पाटीलपाडा येथे या उपक्रमाचा पहिला कार्यक्रम १४ ऑक्टोबर रोजी शंकर डोंगरकर यांच्या चिकू बागेत घेण्यात आला. या वेळी कार्यशाळेला मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांनी या फळावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. मंडळ कृषी अधिकारी सुनील बोरसे यांनी चिकूमधील महत्त्वाच्या समस्या तसेच विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. 

 चिकू रोग, किडी, खत व पाणी व्यवस्थापन तसेच माती परीक्षणाची गरज आदी तांत्रिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी केले. प्रत्येक महिन्याला एक वर्ग अशा प्रकारे वर्षभर हा शेती शाळेचा उपक्रम राबविला जाणार असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन कृषी सहायक विशाल नाईक यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी