शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढत असल्याने चिंता; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:05 IST

जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांनी केली पालघर, बोईसर, डहाणू रेल्वेस्थानकांची पाहणी

पालघर-बोईसर : कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा प्रशासनास यश आले असताना पुन्हा काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात थोडी वाढ होऊ लागल्याचे दिसून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पथकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी पालघर, बोईसर, डहाणू रेल्वेस्थानकांची पाहणी केली.  जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी दळणवळणाचे मुख्य साधन रेल्वे असून या रेल्वेस्थानकामध्ये तसेच रेल्वेमध्ये प्रवासी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करत आहेत का? नागरिक मास्क, सॅनिटायझरचा वापर करत आहेत का? सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत आहेत का? याबाबत पालघर, बोईसर, डहाणू रेल्वेस्थानकांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केली.

पश्चिम रेल्वे येथून सुटणाऱ्या विशेष रेल्वे दिल्ली, राजस्थान, गुजरात आाणि गोवा राज्यांकडे जातात. यामुळे बाहेरगावाहून आलेल्या आणि डहाणू, बोईसर, पालघर रेल्वेस्टेशनवर पोहोचणाऱ्या रेल्वे प्रवाशांची कोविडची चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांनी दिले आहेत. इतर राज्यांतून  येणाऱ्या ट्रेनमधून प्रवाशांच्या तपासणीच्या व्यवस्थेचीही पाहणी या वेळी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संबंधित रेल्वेस्टेशनवर नियुक्त केलेल्या केंद्रांची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या. बाहेरून आलेल्या प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात यावी, अशा सूचना या वेळी त्यांनी दिल्या. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, सहायक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, राहुल सारंग आदी मान्यवर उपस्थित होते.